भुसावळ ः प्रतिनिधी
कोरोना सारख्या भीषण संकटात एकमेकांना मदत करणे आपल्या सारख्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आणि बहुतांश नागरिक आपले कर्तव्य चोख बजावतही आहेत. अनेक समाजसेवी निरपेक्ष भावनेने आपआपल्या परिने होईल तेव्हढी मदत करत आहे. ही मदत उपकार नसून एक सामाजिक कर्तव्यच आहे. अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील उपक्रमशील शिक्षक यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात कोल्ड-हॉट वॉटर ही मशिन भेट दिली आहे.
भुसावल ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर येथे कोल्ड-हॉट वाटर मशीन ची कोविड रुग्णांना गरज आहे, अशी माहिती समाजसेवी कडून श्री.र.न.मेहता हिन्दी प्राथमिक विद्यामंदिर, येथील उपशिक्षक अमित विजय चौधरी यांना समजले असता. त्यांच्या सेवानिवृत्त शिक्षिका आई वत्सला चौधरी यांच्या वाढदिवसानिमित त्यांनी हॉट- कोल्ड वाटर मशीन सप्रेम भेट दिले. जेणेकरून रुग्णांना गरज असेल तेव्हा गरम-ठंड पाणी मिळेल, या प्रामाणिक भावनेने अमित चौधरी यांनी हे मशीन भेट दिले.
याप्रसंगी डॉ.मयूर चौधरी, डॉ.विक्रांत सोनार, डॉ.बी.एच चापोरकर, डॉ.शुभांगी फेगडे, के.एस येवले, गणेश फेगडे, विक्रांत चौधरी, दीपक तेली, हेमंत धांडे, अमित चौधरी, मिलिंद राणे, आय.एल.शिंदे, योगेश गायकवाड़, शेखर, शिशिर जावळे उपस्थित होते. सेवा हे आपले कर्तव्य या भावनेने नागरिकांनी कोविड रुग्णांना मदत केली पाहिजे. तेव्हाच रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा खर्या अर्थाने सार्थकी लागेल. दवाखाना मोठा असल्याने अशी १ मशीन पुरणारी नाही, त्यामुळे कोणाला सहकार्य करायचे असल्यास ते करू शकतात, असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले.