रावेर ः प्रतिनिधी
आज रोजी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी, ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर उभारणीसाठी निंभोरा पोलीस स्टेशन मधील अधिकारी व सर्व पोलीस अंमलदार यांच्या वतीने स्वेच्छेने १३ हजार रुपये तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर ग्रामीण रूग्णालयात डयुरा ऑक्सिजन सिलेंडर उभारण्यासाठी लोकसहभागाचे स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रशासनाकडून मदतीसाठी जाहीर आवाहन करण्यात आले होते. त्यास समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उत्तम प्रतिसाद देत असून रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनचे सपोनि स्वप्नील उनवणे, सह सपोनि स्वप्निल उनवणे, पीएसआय योगेश शिंदे, चालक सादिक शेख, अश्रफ शेख, वराडे, स्वप्निल पाटील, अब्बास तडवी, आणि सर्व पोलीस अंमलदार यांनी सामाजिक बांधिलकी, समाजाप्रती संवेदनशीलता, कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून सदैव प्रयत्नशील आहेत.
पण आज सर्व देशभर कोरोनाचा कहर वाढतोय. सर्व सामान्य कोरोनाबाधित रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज अत्यावश्यक झाली आहे. म्हणून या जाहीर मदतीच्या आवाहनाला निंभोरा पोलीस स्टेशन सर्व कर्मचारी यांनी एकूण १३ हजार रुपयांची देणगी देवून समाजातील इतर सर्वांसमोर एक आदर्श ठेवले आहे, यामुळे निभोरा पोलीस स्टेशनचे सहायक पो.नि.स्वप्नील उनवणेंसह त्यांच्या पोलिस अधिकार्यांचे सर्व समाजातून कौतुक होत आहे.