जळगाव ः प्रतिनिधी
सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कुसुंबा येथील तरुणाच्या विवाहसप्रसंगी वधू-वरांसह २१ जणांनी रक्तदान करुन आदर्श विवाह घडवून आणला.
औरंगाबादचे समाजसेवक सुमित पंडित यांच्या प्रस्तावातून चेतन व स्वाती यांचा विवाह लोणी (ता. जामनेर) येथील श्री गजानन महाराज मंगल कार्यालयात झाला. या विवाह सोहळा प्रसंगी रक्तदान शिबिर घेण्यात आले. विवाहबद्ध होण्या आधी अगोदर वधू-वरांनी रक्तदान केले. यानंतर वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या वरिष्ठ मंडळी, तरूण समाज बांधव असे एकूण २१ जणांनी रक्तदान केले. माणुसकी ग्रुपचे सदस्य यांनी सहभाग नोंदवला. रक्तसंकलन कामी माधवराव गोळवलकर रक्तपेढी जळगाव यांनी सहकार्य केले. माणुसकी ग्रुपचे जिल्हाअध्यक्ष गजानन क्षीरसागर, चंद्रकांत गीते, योगेश वाणी, अनिल पाटील, मनिषा पाटील, निर्मल पाटील, विकास पाटील, गजानन उगले, रत्ना उगले, लक्ष्मण उगले, मोहिनी उगले आदींनी सहकार्य केले.