Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»श्री स्वामी चक्रधर मंदीर सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठीचे आमरण उपोषण मागे
    Uncategorized

    श्री स्वामी चक्रधर मंदीर सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठीचे आमरण उपोषण मागे

    saimat teamBy saimat teamApril 17, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोयगाव ः तालूका प्रतिनिधी
    तालुक्यातील सावळदबारा येथे श्री स्वामी चक्ररधर स्वामी मंदीर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी पं.स.कार्यालयाच्या मैदानात करण्यात आलेले आमरण उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, मधुकर ओंकार गावडे, विनोद ओंकार गावडे, सुधाकर ओंकार गावडे, शे.अमन शे.बिसमिल्ला यांनी तत्कालीन ग्रामसेवकांना हातचे करुन ग्रामपंचायत मूळ रजिष्टरमध्ये खाडाखोड करुन खोटे व बोगस नमुना नंबर ८ अ उतारा करवून घेतला. रहदारीच्या हमरस्त्यावरच अतिक्रमण केले.त्यातच आपआपल्या घरातील साडपाण्याची चारीही काढली. यामुळे परिसरात दुर्गंधीमुळे पसरत असून रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने जाताना तारेवरची कसरत करावी लागते. हा सार्ववजनिक वापराचा रस्ता पुर्वीप्रमाणे अतिक्रमण मोहीम राबवून ग्रा.प. सावळदबारा व पं.स.सोयगाव कार्यातयास वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाचा नाकर्तेपणाचा कळस गाठत कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने व अतिक्रमण धारकांना स्थानिक ग्रामसेवक व्ही.डी.बिडकर, सरपंच स्वाती कोलते पाठिशी घालत असल्याने ग्रामस्थांनी महिनाभरापुर्वी आंदोलनाचा ईशारा दिला होता. या काळात प्रशानाच्या वतीने कुठलीही कायदेशीर कारवाई केली नाही व समर्पक उत्तर न दिल्याने दि.१६ गुरुवार पासुन पं.स.कार्यालयाच्या मैदानात प्राणांतीक उपोषणास बसले असता याची दखल घेत गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांच्या लेखी आश्‍वसनाणे तुर्तास मागे घेण्यात आले आहे.
    उपोषणास बसण्यापुर्वी एक तरक्रारी निवेदन देवुन त्यात म्हणले आहे की, तुमच्या कार्यालयात ३०/३/२०२१ , ३/३/२०२१ ग्रामस्थांनी पं.स.कार्यालयास दिलेला तक्रार अर्ज व सावळदबारा ता.सोयगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ग्राप पंचायत सावळदबारा येथे सादर केलेले अर्ज ता . २८/३/२०१८ , २/१/२०१९ , ८/४/२०२१ , १५/२/२०२१ वरिल विषयी आम्ही खाली सह्या करनारे सावळदबारा ग्रामस्थ सावळदबारा हम रस्त्यावर श्री स्वामी चक्रधर मार्गावरील सार्वजणीक रस्त्यावरील बेकायदेशीर अतीक्रमण झालेले असल्याने ते काढण्यात यावे करीता गेल्या इ . स . २०१८ पासुन पाठपुरावा करीत आहोत.मात्र या बाबत आपल्या कार्यालयाकडून व ग्रा . प . कार्यालयाकडून उचीत कायदेशीर कायदेशीर योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही तुमच्या कार्यालयाकडून व ग्रा . प . कार्यालय सावळदबारा कडून फक्त आश्‍वाशनाची खैरात वाटण्यात आली व वेळोवेळी बेकायदेशीर अतिक्रमणा विषयी तक्रारी का देतात म्हणुन अतिक्रमण धारक १ ) मधुकर ओंकार गावडे , २) विनोद ओंकार गावडे, ३)सुधाकर ओंकार गावडे , ४) शे. अमन शे. बिसमिल्ला हे हेतुत आम्हाला कुठलेही दुसरे कारण नसतांना दुराग्रह करीत अंगावर घावून येत भांडन करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करतात . जानुण बुजून सार्वजणीक रस्त्यावर खाट्या आडव्या टाकणे , दुचाकी वाहने रस्त्यावर लावने , वापराचे सांडपाणी रस्त्यावर काढने असले प्रकार तर नित्याचेच झाले आहे . ग्रा.पं.च्या मुळ रजिस्टर मध्ये खोडखाड करुन वरिल लोकांनी जागेचा नंमुना नंबर ८ अ चा उतारा करवून घेतला असुन तसला पुरावा हा तुमच्या कार्यालयास सादर ही केलेला असुनही मात्र समाधानकारक कारवाही तुमच्या कार्यालयाकडून किवा ग्राम पंचायत कार्यालयाकडून करण्यात आलेली नाही. योग्य ती कारवाई व्हावी म्हणुन प्राणांतीक उपोषणास बसणार असल्याचे नमुद केले होते.

    कोरोना १९ महामारीने जगात व देशात थैमान घातले असल्याने सोयगाव पोलीस स्टेशनचे सपोनि सुदाम शिरसाठ, गटविकास अधिकारी तुपे यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केल्याने व योग्य कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले म्हणून तुर्तास आमरण उपोषण तुर्तास स्थगित करीत आहोत.
    – गजानन चव्हाण
    आंदोलक ग्रामस्त सावळदबारा

    ग्रामसेवकांनी सुटीचा अर्ज पं.स. कार्यालयास दिला आहे. मात्र, पुरावा नसताना त्याचा अर्ज मंजुर करण्यात आलेला नाही. वेळोवेळी त्यांना अतिक्रमण मोहीम हाती घेण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. मात्र ते गैरहजर आहेत. आंदोलक ग्रामस्थांनी आम्हाला पुन्हा १५ दिवस वेळ दिल्यास पं.स. कार्यालय अतिक्रम हटाव मोहीम त्रिव्र करील सावळदबारा येथे जावुन प्रत्येक्ष पाहनी करुन हयगय करनार्या प्रशासकीय कर्मचार्यांवरही कारवाईचा बडगा उगारल्या जानार
    – सुदर्शन तुपे
    गटविकास अधिकारी सोयगाव

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025

    Bangladesh Earthquake : बांगलादेश भूकंपाने हादरला: 6 मृत, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली

    November 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.