Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावल तहसीलदारांचे पथक मनवेल-थोरगव्हाण परिसरात
    यावल

    यावल तहसीलदारांचे पथक मनवेल-थोरगव्हाण परिसरात

    saimat teamBy saimat teamApril 15, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ः तालुका प्रतिनिधी
    दि.१३ रोजी ‘गुढीपाडवा मुहूर्त वाळूतस्करांसाठी मोठी सुवर्णसंधी, महसूलच्या नाकावर टिच्चून अवैध गौण खनिज वाहतूक’असे वृत्त सायंदैनिक ‘साईमत’ मध्ये प्रसिद्ध झाल्याने त्याची दखल यावल महसूल विभागाने घेतली असून काल दि.१४ रोजी शासकीय सुटीच्या दिवशी महसूल पथक थोरगव्हाण- मनवेल परिसरात गेले असता यावल महसूल पथक नेमके कोणत्या ठिकाणी चौकशी किंवा कारवाई करणार यासाठी खुद्द काही अवैध वाळू तस्करांनीच मोटर सायकलीवरून महसूल पथकाचा पाठलाग करून पथकावर पाळत ठेवल्याचे तसेच महसूल पथक अवैध वाळू वाहतूकदारांवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.
    महसूल गस्ती पथकात नेहमी- नेहेमी, तेच- तेच चेहरे राहात असल्यामुळे वाळू तस्करांवर कारवाई करताना संशय व्यक्त केला जात आहे.त्यामुळे गस्ती पथकातील अधिकारी व कर्मचारी रोजच्या रोज बदलले पाहिजेत.त्याशिवाय वाळू तस्करांवर कडक कारवाई होणार नाही,असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. पिळोदा, दगडी, मनवेल, थोरगव्हाण ही चार गावे मिळून एक तलाठी सजा कार्यालय असल्याने परिसरातील वाळू तस्करांना यावल महसूल पथक येत असल्याची माहिती मोबाईलवरून किंवा व्हाट्सअप वरून कोणी कशी व का दिली? यांचे नेहमीचे मासिक हप्ते सुरू आहेत का? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
    तरी महसूल पथकाने कारवाईसाठी जाताना आपल्या कारवाईची गोपनीयता बाळगणे आवश्यक झाले आहे. महसूल पथकाची कारवाई वाळू तस्करांना समजून जात असल्याने वाळू तस्कर आपली वाळूची वाहने अज्ञात ठिकाणी लावून ठेवतात त्यामुळे अवैध वाळू वाहतूक दारांवर कारवाई होत नाही.अवैध वाळू तस्करांची अवैध वाळू वाहतूकची वेळ ही रात्री दोन वाजेपासून तर सकाळी ७ वाजेपर्यंत असते.या वेळेतच महसूल पथकाने गस्ती पथक या ठिकाणी तैनात करून कडक कारवाई करायला पाहिजे परंतु या वेळेस सुद्धा वाळूचे डंपर आणि ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करतात कशी? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.