रमजान पर्वाला शासकीय नियमानुसार सुरुवात; रोजा इफ्तार आपआपल्या घरी

0
9

जळगाव ः प्रतिनिधी
१४ एप्रिल बुधवारी रमजान महिन्याचा पहिला रोजा सर्व भारतात करण्यात आला.महाराष्ट्र राज्यात असलेल्या कडक निर्बंधात उपवासाला सुरुवात झाली.
नमाज व रोजा घरातूनच साजरे करा-आवाहन
रमजानची नमाज व रोजा हे आपआपल्या घरातूनच साजरे करण्याबाबत शासनाचे परिपत्रक असल्याने त्याची अंमलबजावणी पुरेपूर करण्यात यावी असे आवाहनसुद्धा शहर ए काझी मुफ्ती अतिकउर रहेमान व ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक,सचिव फारूक शेख यांनी काल झालेल्या उलमा व ट्रस्टी च्या सभेत केले.
रात्री फिरू नका आव्हान
रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत १४४ कलम असल्याने कोणीही नमाज घरी पठण केल्यानंतर बाहेर फिरू नये तसेच दिवसासुद्धा गर्दी करू नये असे आवाहन मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्टतर्फे करण्यात आल्याचे पत्रक सचिव फारूक शेख यांनी प्रसिद्धीला दिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here