चंद्रदर्शन न झाल्याने बुधवारपासून रमजान पर्वाला सुरवात

0
15

जळगाव ः प्रतिनिधी
माहे रमजानचे चंद्रदर्शन सोमवारी रात्री न झाल्याने रमजान पर्वला बुधवारपासून सुरुवात होईल.पहिली तरावीहची नमाज मंगळवारी रात्री होईल व रोजा (उपवास) बुधवारी होईल असे जळगाव रूहते हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना उस्मान कासमी यांनी घोषित केले.
सोमवारी संध्याकाळी जामा मसजीद येथे रूहते हिलाल कमिटीची सभा झाली.यावेळी शहरे काजी मुफ्ती अतिकउर रहेमान यांनी चंद्र दर्शनाची पार्श्‍वभूमी समजावून सांगितली.
या सभेत मर्यादित मशिदीचे इमाम व विश्‍वस्त यांना आमंत्रित केले होते त्यात प्रामुख्याने मौलाना जाकिर देशमुख, हाफिज रेहान बागवान , हाफिज वसीम पटेल ,मौलाना जुबेर , यासह सय्यद चॉंद, इदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख ,मुकीम शेख ,अश्फाक बागवान, अनिस शाह, ऍड.सलीम शेख, ताहेर शेख, इक्बाल बागवान आदी उपस्थित होते.रूहते हिलाल कमिटीच्या सभेचे सूत्रसंचालन व आभार इदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here