जळगाव ः प्रतिनिधी
महाबीजचे अधिकारी कर्मचार्यांना सातवे वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी आज ९ डिसेंबर पासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे दि.३० जानेवारी २०१९ रोजीच्या आधिसूचनेनुसार शासकीय कर्मचार्यांना दि.१ जानेवारी २०१६ पासून सातवे वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर महाबीज मधील अधिकारी कर्मचार्यांना महाबीजच्या संचालक मंडळाने १९४ व्या सभेत निर्णय घेवून महाबीज कर्मचारी अधिकार्यांना सातवे वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देऊन तसा प्रस्ताव अध्यक्ष महाबीज तथा सचिव कृषि यांच्यामार्फत वित्त विभागाने प्रस्तावित केल्यानुसार सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी अधिकार्यांना सातवे वेतन आयोग लागू करण्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंत्री मंडळाने मान्यता दिलेली आहे. परंतु वित्त मंत्रालयाकडून महाबीजची फाईल कृषी विभागाकडे आलेली नाही. त्यामुळे अद्यापही महाबीजच्या कर्मचार्यांना आयोग लागू होत नसल्याने महाबीज कर्मचार्यांनी आज दि.९ पासून बेमुदत संप पुकाराला आहे.