यावल ः सुरेश पाटील
हतनूर धरणाचा पाट यावल रावेर तालुक्यातून गेलेला आहे या पाटाच्या आजूबाजूस असलेले बाभळीचे झाड आणि इतर वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्याचा सपाटा लाकूडतोडणार्यानी सुरु केला असून यात
किनगाव येथील एक कर्मचारी सहभागी असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे तरी हतनुर विभाग उपविभागीय अभियंता एस.एस.चौधरी यांनी वृक्षतोड करणार्यांविरुद्ध कडक कारवाई करावी असे बोलले जात आहे.
हतनूर धरणाच्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणात बाभळीच्या झाडासह इतर वृक्ष मोठमोठे झालेली आहेत ही वृक्षतोड किनगाव येथील एक कर्मचारी करीत असून लाकूड तोडणारे हे लाकूड चेरी फॅक्टरीत व इतर व्यवसायिकांना विक्री करून मोठ्या प्रमाणात कमाई करीत आहे काहीजण बाभळीची झाड तोडून त्याचा कोळसा पाडून कोळसा विक्रीचा व्यवसाय सुद्धा करीत आहेत. हतनुर उपविभाग यावल उपविभागीय अभियंता एस.एस.चौधरी वृक्षतोड करणार्यांविरुद्ध तसेच त्या किनगाव येथील कर्मचार्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी असे संपूर्ण यावल तालुक्यातून बोलले जात आहे.