विकासासाठी निधी द्या – पालकमंत्र्यांना साकडे

0
26

जळगाव ः प्रतिनिधी
महापालिकेतील सत्तांतरानंतर प्रथमच महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली.महापालिकेत सत्तांतर झाल्यापासून पालकमंत्री कोरोना संसर्ग झाल्याने रुग्णालयात होते. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. शहराच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी पदाधिकार्‍यांनी केली.
या वेळी महापौर आणि उपमहापौर यांनी शहराच्या विकासाबाबत विविध मुद्यांवर मंत्र्यांसोबत चर्चा केली. जळगाव शहर मनपात बहुमत नसतानाही शिवसेनेने आपला भगवा फडकवला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने शिवसेनेच्या जयश्रीताई महाजन महापौर झाल्या. महापौरांनी पदभार स्वीकारला तेव्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील कोरोना संसर्गामुळे मुंबई येथे उपचार घेत होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर पालकमंत्री जळगावात परतले आहेत. शुक्रवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट घेऊन पालकमंत्र्यांकडे शहरासाठी निधी देण्याची मागणी केली. या वेळी पालकमंत्र्यांनी राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे सांगितले. या वेळी माजी महापौर विष्णू भंगाळे, नितीन लढ्ढा, सुनिल महाजन, अमर जैन, प्रशांत नाईक, नितीन बरडे, शरद तायडे, सरिता माळी-कोल्हे, अनंत जोशी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here