जळगाव ः प्रतिनिधी
येथील रोटरी परिवारातर्फे देवकर महाविद्यालयातील शासकीय आयुर्वेद कॉलेजला कोरोना रुग्णांसाठी एक लाख ६८ हजार रुपयांचे सहा ऑक्सीजन मशिन देण्यात आले.
शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करुन सेवारथ संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रोटरी मिटडाऊनचे माजी अध्यक्ष दिलीप गांधी व सहप्रांतपाल डॉ.अपर्णा मकासरे यांच्या पुढाकारातून ऑनलाईन मिटींगच्या माध्यमातून अवघ्या दोन दिवसात या मशिनसाठी निधी संकलन करण्यात आले.
रोटरी क्लब जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे प्रत्येकी दोन तर रोटरी क्लब जळगाव मिडटाऊन आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे प्रत्येकी एक अशा सहा ऑक्सीजन मशिन १२ रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते या मशिनचे लोकार्पण करण्यात आले.त्याप्रसंगी डॉ. अपर्णा मकासरे, डॉ.तुषार फिरके, प्रा.डॉ.अपर्णा भट-कासार, जितेंद्र ढाके,
डॉ. रेखा महाजन, तुषार चित्ते, विष्णू भंगाळे, संदिप शर्मा, महेंद्र रायसोनी, कुमार वाणी, सुनिल सुखवाणी, विवेक काबरा, योगेश गांधी, प्रविण जाधव, महेंद्र गांधी आदिंसह रोटरी परिवारातील मान्यवरांची उपस्थिती होती.