जैन इरिगेशनचे आनंद पाटील यांना राज्यस्तरीय चित्र स्पर्धेत नामांकन

0
10

जळगाव ः प्रतिनिधी
येथील जैन इरिगेशनचे चित्रकार आनंद पाटील यांच्या चित्राचे राज्यस्तरीय कॅमलिन आर्ट फाऊंडेशनच्या चित्रकला प्रदर्शनात निवड झाली आहे. कला स्पर्धांमध्ये कॅमलिन आर्ट फाऊंडेशनचे नाव जगात नावाजलेले आहे. दर वर्षी आयोजित होणार्‍या या स्पर्धेत हजारों स्पर्धक भाग घेत असतात. चार पुरस्कार व्यावसायिक चित्रकार तर बारा चित्र विद्यार्थी विभागात राष्ट्रीय पुरस्कार दिली जाताता. पोर्ट्रेट, लँडस्केप, स्टील-लाईफ व क्रिएटिव्ह पेंटिंग अशा प्रकारात प्रवेशिका मागविण्यात येते. सदरील स्पर्धेत जळगावचे चित्रकार आनंद पाटील याचे पोर्ट्रेट (व्यक्ती) चित्र या प्रकारातील बाबा ह्या चित्राची निवड झाली आहे. हे जल रंगातील आहे.
यापूर्वी मुंबई येथील जे जे. अपलाइड आर्ट कॉलेजमध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना वर्ष २००३ मध्ये वार्षिक प्रदर्शनात देखील कॅमलिन आर्ट बेस्टचा कलर्स एन्ट्री पुरस्कार ही आनंद पाटील यांना प्राप्त झाला होता. तसेच कला क्षेत्रातील अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. आजवर पाटील यांची पाच एकल प्रदर्शन संपन्न झाली आहेत आणि आठ गृप शो तसेच दोन कला मेळाव्यात सहभाग नोंदविला आहे. आनंद पाटील यांची दोन चित्रे ही कॅनडा, सहा चित्रे मुंबई, सात चित्रे भुसावळ तर साठपेक्षा अधिक चित्र जळगाव मध्ये संग्रहीत आहे. निसर्गचित्रांसोबत व्यक्तिचित्रांची त्यांना (पोर्ट्रेट) आवड आहेत.
कॅमलिन आर्ट फाऊंडेशनच्या कला प्रदर्शनात चित्राची निवड होणे ही फार कौतुकास्पद आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजीत जैन यांनी अभिनंदन केले तसेच कलाक्षेत्रातील मान्यवर, कलारसिक आणि मित्रमंडळींकडूनही आनंद पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here