रेमडेसिवीरची जादा दराने विक्री केल्यास कारवाई

0
19

जळगाव ः प्रतिनिधी
काही औषधविक्रेते रेमडेसिविर इंजेक्शन जादा दाराने विक्री करत आहेत. अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी काल पत्रकार परिषदेत दिला.
काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा मेडिसिन डिलर्स असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जोपासत हे इंजेक्शन १ हजार २०० रुपयांना विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जिल्ह्यातील काही औषध विक्रेत्यांकडून अद्यापही जादा दरात इंजेक्शन विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे.अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासन तसेच जिल्हाधिकार्‍यांकडे प्राप्त झाल्या आहेत.त्यासंदर्भात भूमिका विषद करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.या वेळी केमिस्ट संघटनेचे सचिव अनिल झंवर, सहसचिव श्रीकांत पाटील,भुसावळ तालुका सहसचिव ईश्वर चौधरी आदी उपस्थित होते.
यांच्याकडे करा तक्रार
रेमडेसिवीरची जादा दराने विक्री करणार्‍यांची जिल्हा अन्न व औषध प्रशासन अधिकारी डॉ. अनिल माणिकराव (८२०५६०४०८६) यांच्याकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here