साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी
डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पात्रात टीव्हीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचले. त्यांनी साकारलेले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज प्रेक्षकांच्या मनावर ठसले आहे. डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आग्र्यातील लाल किल्ल्यावर या सिनेमाचे चित्रीकरण झाले असून लाल किल्ल्यावर शूट होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.
ही बातमी पण वाचा : कैटरिना कैफ आणि विक्की कौशल या जोडीला जीवे मारण्याची धमकी!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याची गाथा या चित्रपटाद्वारे डॉ. कोल्हे हे सांगणार आहेत. ‘शिवप्रताप गरूडझेप’ या सिनेमात शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका हा प्रसंग मध्यवर्ती आहे. शिवाजी महाराजांचे सामर्थ्य आणि त्यांचे बुध्दीकौशल्यही वाखाणण्याजोगे होते. रक्तपात न करता शत्रुला पराभूत करता येते, हे शिवरायांनी त्यांच्या गनिमी काव्यातून दाखवले आहे. या चित्रपटाचे पहिले गाणे ‘बम बम भोले’ आज (२५जुलै) प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामधला जोश चाहत्यांना खूप आवडला आहे.