जळगाव ः प्रतिनिधी
मनपात झालेल्या सत्तांतरामध्ये माजीमंत्री एकनाथराव खडसे यांचीदेखील भूमीका होती. मनपात भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मुख्यमंंत्र्यांशी संवाद साधला होता. दरम्यान, महापौर निवडीनंतर महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांंनी माजीमंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या शहरातील निवासस्थानी जावून भेट घेतली.
माजीमंत्री एकनाथराव खडसे जळगाव शहरात आले असता महापौर जयश्रीताई पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांची भेट घेवून चर्चा केली. खडसेंनी दोन्ही नवनिर्वाचीत पदाधिकांर्याचे स्वागत केले.
या वेळी माजी आ.डॉ .गुरूमुख जगवाणी, राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, माजी उपमहापौर सुनील खडके, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, डॉ.अभिषेक ठाकूर, प्रा.सचिन पाटील, राष्ट्रवादीचे अशोक पाटील, ललित शर्मा, युसूफ पिंजारी उपस्थित होते.