चाळीसगाव ः प्रतिनिधी
कोरोना संसर्गजन्यरोग प्रमाण वाढत असल्याने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी शासकीय जनता कर्फ्युचे आदेश दिले. चाळीसगाव येथे शनिवार व रविवार दोन दिवस कडक बंदला चाळीसगावकरांनी १०० टक्के प्रतिसाद दिला आहे.
काल रात्री चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. ठीकठिकाणी पोलीस आहेत. खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीवदादा देशमुख, नगराध्यक्ष आशालता चव्हाण,प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत सताळकर, तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, डीवायएसपी कैलास गावडे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व कोरोना बचाव समितीचे, वर्धमान धाडीवाल, नानासाहेब बागुल, दिलीप घोरपडे, लक्ष्मण शिरसाठ, योगेश भोकरे, मुराद पटेल, आरिफ खाटीक, विजय गायकवाड यांनी नागरिकांना घरात राहण्याचे व कोरोनापासून बचावचे आवाहन केले आहे.