जळगाव ः प्रतिनिधी
रोटरी क्लब जळगावतर्फे रोटरी कम्युनिटी क्रॉर्प समितीची स्थापना करून दाणाबाजारातील गरीब होतकरू हमालांना लोटगाडीचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या काळात कष्टकरी जनतेसमोर आर्थिक अडचणी येत आहे. स्वभिमानाने काम करणार्या हमाल बांधवांना मदत व्हावी या हेतूने रोटरी क्लब जळगावने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे अध्यक्ष जितेंद्र ढाके यांनी सांगितले.
कार्यक्रमाला सेक्रेटरी डॉ.काजल फिरके, आरसीसी कमिटी चेअरमन किशोर तलरेजा,डिस्ट्रिक सहसचिव डॉ.तुषार फिरके, कॅप्टन मोहन कुलकर्णी, योगेश गांधी, अॅड. श्रीकांत भुसारी, राजू आडवाणी, आसिफ मेमन, दिलीप जैन,श्याम अग्रवाल,आशुतोष पाटील, मनीष झंवर, शेषराव वेलकर आदी उपस्थित होते.