भांडण सोडविणे आले अंगलट

0
15

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील समता नगर परिसरात मित्रांचे आपसात सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला शिष्टाई करणे महागात पडले असून सदर भांडण सोडविणे त्याच्या अंगलट येत भांडण करणार्‍या दोघांनी त्या तरुणावरच चॉपरने हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, समता नगर परिसरात राहणारा विक्की रविंद्र इंगळे (वय २१) हा तरुण आपला मित्र मोन्या (पूर्ण नाव माहित नाही) याच्यासोबत महाबळ परिसरात काल रात्री ९ वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी गेला होता. यावेळी समता नगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अशफाक पटेल आणि जयेश कोळी (दोन्ही रा.समता नगर) मोन्याचे किरकोळ कारणावरुन भांडण झाले. भांडण सुरु असतांनाच विक्कीने भांडण करणार्‍या मित्रांना म्हणाला की, तुम्ही कशाला भांडण करता आहात? भांडण करु नका, अशी शिष्टाई भांडण सोडवण्यासाठी करायला लागला असता अशफाक पटेल याने विक्की यास चापटा बुक्क्यांनी मारहाण करत चॉपरने वार करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अचानक झालेल्या हल्ल्याने विक्की इंगळे प्रचंड हादरला व जखमी अवस्थेतच जीव मुठीत घेवून पळाला. तो धामणगाव वाडा चौकात असलेल्या मित्रांना जखमी अवस्थेत दिसल्याने त्यांनी त्यास जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, विक्की इंगळे याच्या फिर्यादीवरुन जयेश कोळी व अशफाक पटेल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुशिल चौधरी हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here