जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांचा त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याबद्दल , जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती व राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे,श्री दत्तप्रभू अँग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. सावेर ता.शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार व कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सक्षम महिला सन्मान हे दोन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यापैकी राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार हा प्रदुषण नियंत्रण अधिकारी सौ. सौजन्या पाटील, गट शिक्षण अधिकारी सौ. सुरेखा देवरे,चोपडा नगरपरिषद च्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. मनिषा जीवन चौधरी, धुळे मनपाच्या नगरसेविका सौ. वंदनाताई संजय भामरे , उद्योजिका सौ. मनिषा किशोर डियालाणी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रेमकुमार अहिरे सर व श्री. वाघ सर तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे पदाधिकारी सदस्य उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.
तसेच कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना , महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेचे जिल्हाअध्यक्ष कोमल पाटील यांच्या हस्ते सक्षम महिला सन्मान देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी कार्याध्यक्ष आरोही नेवे, रावेर अध्यक्ष भाग्यश्री बाविस्कर, प्रीती चव्हाण, शिवानी बाविस्कर आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना दिव्या भोसले म्हणाल्या की , हा गौरव माझा एकटीचा नसून आपल्या सर्व मित्रपरिवाराचा आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद आहेत म्हणूनच मला हे सर्व शक्य आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल मला आनंद आहे मात्र आता माझी जबाबदारी अधिक वाढलेली आहे .त्यामुळे मी जास्तीत जास्त समाज हिताचे काम करेन.