महिला बाल विकास विभागातर्फे कोरोनायोध्दांच्या कार्याचा गौरव

0
71

जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना व प्रतिभा फाउंडेशनतर्फे कोरोना काळात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी-कर्मचार्‍यांना कोरोना योद्धा म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले. यात बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना अटाळे, आबेदा तडवी, जागृती तायडे, रजिया पठाण, ललिता पाटील, मेघा चौधरी, वैशाली भालेराव, चंद्रकला चव्हाण, आशा गजरे, अनिता पाटील, कल्पना वायसे, प्रमिला पाटील, मिना सुळे, नंदा अवचर, शोभा बारेला, आशा महाजन, समृद्धी संत आदींचा गौरव करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे कोरोनो योद्धा महिलांचा सन्मान करण्यात आला. महिला व बाल विकास समितीच्या सभापती ज्योती पाटील यांच्या दालनात सत्काराचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, समितीच्या सभापती ज्योती पाटील, माजी अध्यक्षा उज्वला पाटील, जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे, महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. तडवी उपस्थित होते.
प्रास्ताविक सहाय्यक प्रशासन अधिकारी व प्रतिभा फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा सुर्वे यांनी केले.या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारीअधिकारी गणेश चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार, इंदिरा सोनवणे यांची उपस्थिती होती. मंगेश बाविस्कर, अजय चौधरी, धनराज सोनवणे, संजय सूर्यवंशी, कल्पना चव्हाण, सरला पाटील, रेखा बडगुजर, रत्ना तायडे, रामेश्‍वर कुंभार, बळीराम सुर्यवंशी, भूषण तायडे, वसंत बैसाणे, माधुरी बेहेरे, छाया पाटील आदींनी सहकार्य केले. ज्योती राणे यांनी सूत्रसंचालन केले. शैलजा पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here