Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»प्रा.वायुनंदन यांनी कुलगुरुपदाचा स्विकारला पदभार
    जळगाव

    प्रा.वायुनंदन यांनी कुलगुरुपदाचा स्विकारला पदभार

    saimat teamBy saimat teamMarch 9, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार प्रा.ई.वायुनंदन यांनी मावळते कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडून काल सकाळी स्वीकारला. सर्वांना सोबत घेऊन या विद्यापीठाच्या विकासासाठी बांधील असल्याची ग्वाही प्रा.वायुनंदन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली.
    प्रा.पी.पी.पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्यामुळे कुलपती तथा राज्यपालांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती केली. सोमवार दि ८ मार्च रोजी सकाळी प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडून प्रा.वायुनंदन यांनी पदभार स्वीकारला.
    कुलगुरुंच्या दालनात झालेल्या छोटेखानी समारंभात बोलतांना प्रा.वायुनंदन म्हणाले की, चार वर्षापुर्वी आजच्याच दिवशी मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुलगुरु म्हणून पदभार स्वीकारला होता.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी नुकत्याच झालेल्या ऑनलाईन परीक्षा शंभर टक्के यशस्वी करून दाखविल्या. आपण मीतभाषी असून बोलण्यापेक्षा कामावर अधिक विश्वास आहे. या विद्यापीठाने तंत्रज्ञानात प्रगती केलेली असून सर्वांना एकत्र व सोबत घेऊन काम केले जाईल. मी मुळात शिक्षक असून नंतर कुलगुरु आहे, असेही ते म्हणाले.
    प्रा.पी.पी.पाटील म्हणाले की, १९९१ साली या विद्यापीठात शिक्षक म्हणून रूजू झालो तेव्हा आय.टी.आय.च्या वसतीगृहात हे विद्यापीठ सुरू झाले होते. तेव्हा पासून अनेक अडचणींवर मात करत सर्वांन सोबत काम केले. २०१६ मध्ये कुलगुरूपदावर काम करण्याची संधी मिळाली. सव्वाचार वर्षात सर्वांना सोबत घेऊन काम केले. सर्व प्राधिकरणे, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, प्राचार्य, संस्था चालक या सर्वांनी माझ्यावर प्रेम केले सोबत राहीले या बद्दल प्रा.पाटील यांनी ऋृण व्यक्त केले. प्रकृती साथ देत नसल्यामुळे आपण या पदाचा राजीनाम दिला असेही ते म्हणले.
    प्रारंभी प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही पवार यांच्या हस्ते प्रा.पी.पी.पाटील व प्रा.वायुनंदन यांचा शाल, स्मृतीचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती वायुनंदन यांचा सत्कार व्य.प सदस्य डॉ.प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहूलीकर यांचा कार्यकाळ देखील प्रा.पी.पी.पाटील यांच्या सोबत संपुष्टात आल्यामुळे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांच्या हस्ते प्रा. माहुलीकर यांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य आर.पी. फालक, प्रा.मोहन पावरा, दीपक बंडू पाटील, प्रा.जितेंद्र नाईक, डॉ. प्रिती अग्रवाल, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, प्राचार्य पी.पी.छाजेड, प्राचार्य डॉ.प्रमोद पवार, प्राचार्य डॉ. अशोक राणे, प्राचार्य व्ही.आर.पाटील, प्रा.संजय शेखावत, प्राचार्य बी.युवाकुमार रेड्डी, एस.आर.गोहील आदी उपस्थित होते.
    पदभार स्वीकारल्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात प्रभारी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिष्ठाता यांची बैठक घेऊन संवाद साधला. या बैठकीत व्य.प.सदस्य दिलीप पाटील यांनी कुलगुरु प्रा.वायुनंदन व प्रा.पी.पी.पाटील यांचे स्वागत केले, प्राचार्य एल.पी. देशमुख यांनी प्रा.पी.पी.पाटील यांच्या कार्यकाळात झालेल्या उल्लेखनिय कामांचा आढवा घेत विद्यापीठाच्या विकासासाठी प्राधिकरण सदस्य कुलगुरुंच्या सोबत कायम राहतील अशी ग्वाही दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.