जळगाव : प्रतिनिधी
केसीई सोसायटी शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जनजागृती अभियान शुक्रवारी मास्कबाबत अभियान राबवण्यात आले. कोरोनाचा कहर टाळायचा असेल तर मास्क घाला,असे सांगतानाच ज्यांनी मास्क घातले अशा १०० नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन प्रोत्साहित करण्यात आले, तर ज्यांनी मास्क लावले नव्हते अशा ३०० नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. ४०० जणांना सकारात्मक संदेश देण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य वाहतूक निरीक्षक देविदास कुनगर उपस्थित होते. त्यांनी रस्ते सुरक्षा, कोरोनासंबधी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी अध्यक्षीय भाषणात कोरोना जनजागृती संदर्भात मनोगत व्यक्त केले. कोरोना पुन्हा वाढतो आहे. त्यामुळे सध्या मास्क वापरणे हेच योग्य असल्याने त्याबाबत जनजागृती करण्यासह मास्क वापरणार्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शुक्रवारी सकाळपासूनच मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ही मोहीम अनोख्या अशा पद्धतीने राबवण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण कोल्हे व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना चौधरी यांनी केले होते.
उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीप केदार, विभाग प्रमुख प्रा. नीलेश जोशी, डॉ. शैलजा भंगाळे, संजय जुमनाखे, प्रा. केतकी सोनार, मोहन चौधरी, नीलेश नाईक, शैलेश कुलकर्णी, विनोद पाटील हे उपस्थित होते. रासेयोचे व स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.