फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या दुसर्या संभाव्य लाटेची परिस्थिती असताना स्कोर नगरपालिका अंतर्गत येणार्या कॉलनी भागांमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे.कॉलनी भागांमध्ये गेल्या महिन्याभरापासून घंटागाडीची घंटा वाजलीच नाही.त्यामुळे घराघरांमध्ये केराच्या बादल्या भरून कचरा साचला आहे.हाच कचरा महिलावर्ग आपल्या सोयीच्या ठिकाणी टाकून देतात. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. गटारीतील काढलेली घाण उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने ती घाण कोरडी होऊन परिसरातील डुकरे त्याच ठिकाणी पसरवित असतात. त्यामुळे स्वच्छतेचा अविर्भावात असलेल्या नगरपालिकेने स्वच्छतेच्या नावाने कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा स्वच्छतेचा पार बोजवारा उडाला आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता एकूण पाच घंटागाडी व पाच ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यासाठी नगरपालिकेकडे आहे. मात्र प्रत्यक्षात त्यापैकी तीन घंटा गाडी व दोन ट्रॅक्टर प्रत्यक्षात सुरू आहे. बाकी ट्रॅक्टर व घंटा गाड्या कुठे गेल्या ? हा प्रश्न आहे.
घनकचर्याचे दरवर्षी कोट्यावधी खर्च होऊनही शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. या बाबींकडे मुख्याधिकार्यांनी लक्ष देऊन समस्या दूर करावी अशी मागणी केली आहे.