जळगाव ः संतोष ढिवरे
जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्रातील रेशन वितरण प्रणालीतील एनआयसी सर्वर बंद असल्या कारणाने आज सलग तिसर्या दिवशी महाराष्ट्रात मशीन बंदचा फटका रेशन वाटपावर झालेला आहे. रेशन दुकानदार व ग्राहक यामुळे हैराण झाले आहेत.
जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना मार्च २०१७ पासून बायोमेट्रिक रेशन प्रणालींतर्गत पीओएस मशीनचे वाटप करुन मशीन संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे होते. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात संबंधित तहसील कार्यालयाच्यावतीने पीओएस मशिनचे वाटप करण्यात आले आहे. मार्च २०१७ पासून जिल्हाभरात ही प्रक्रिया पूर्ण होऊन बायोमेट्रिक रेशन प्रणालीस सुरुवात झाली आहे. या प्रणाली नुसार स्वस्तधान्य कार्डधारकांना आता मशीनमध्ये पीओएस केल्यानंतर धान्याचे वाटप केले जाते .मशीनमध्ये पीओएस केल्यानंतर ज्या कुटुंबातील शिधापत्रिकाधारकाचे आधारकार्ड ऑनलाईन नोंदणी असेल तेवढ्याच लोकांचे धान्य मिळते.यासाठी कुटुंबातील सदस्य धान्य घेताना आवश्यक असतात. प्रत्येक रेशन दुकानदाराला शासनाने पीओएस मशीन उपलब्ध करून दिले आहे. या मशीनला अंगठ्याचा किंवा बोटाचा थम दिल्यानंतरच या कार्डधारकाला धान्य मिळते.
बायोमेट्रिक पद्धतीने रेशन वितरण जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना पीओएस मशीन पुरवण्यात आले आहेत.पूर्ण महाराष्ट्रात पिओएस मशिन रेशनदुकानदारांना पुरविण्याचा ठेका एकाच कंपनीला दिला असून त्या मशिन भाडेतत्वावर वापरण्यास दुकानधारकांना दिल्या आहेत परंतु मशीनमध्ये अनेक तांत्रिक बिघाड असल्याने रेशन दुकानधारक व कार्डधारक यांच्यामध्ये नेहमीच वादाच्या ठिणग्या पडत असतात.
प्राप्त माहितीनुसार,गेल्या सलग तीन दिवसापासून एनआयसी सर्व्हर बंद असल्या कारणाने महाराष्ट्रात रेशन वाटपाचे काम थांबलेले आहे.यामुळे दुकानदार व ग्राहक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.पीओएस मशिनमध्ये अनेक त्रृटी या सुरुवातीपासूनच असल्यामुळे रेशनदुकानदार व ग्राहक हैराण झाले आहेत. पीओएस मशिनमध्ये नेहमी वेगवेगळ्या कारणाने नादुरुस्त होत असतात. मशिन मध्ये नेटवर्क न येणे, बॅटरी खराब झाल्याने चार्जिंग न होणे, बॅटरी प्रॉब्लेममुळे पावतीचे ऑप्शन दाबल्यास मशीन पूर्णपणे बंद पडणे, कंपनीकडून मशीन रिपेअरसाठी स्पेअरपार्ट वेळेवर उपलब्ध न होणे, त्यामुळे मशीन जीर्ण अवस्थेत असून तांत्रिक बिघाड वारंवार होऊन लाभार्थ्यांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागणे तसेच थंब मॅच न होणे अशा अनेक तक्रारी होत असतात.
जळीळी या कंपनीचे हे मशीन असून त्यामध्ये कंपनीने सोबत २ॠ इंटरनेट कार्ड दिले होते, परंतु फोरजी इंटरनेटच्या काळामध्ये कंपनीने दिलेले २ॠ कार्ड असल्याने दुकानदारांना त्यांच्या स्वतःच्या खिशातून वाय-फाय इंटरनेट किंवा ४ॠ कार्ड च्या माध्यमातून आपल्या खिशातून रिचार्ज करावे लागते.त्यांना दुरुस्तीसाठी ठेकेदाराकडून तालुका निहाय टेक्निशियन नेमण्यात आला असला तरी दुकानदारांना मशीनबाबत तांत्रिक अडचण आल्यास प्रत्येक वेळी मशीन तहसील कार्यालयात जमा करावी लागते.त्यानंतर तिची दुरुस्ती झाल्यावर दुकानदारास परत केली जाते. तोपर्यंत मशीन नसल्यामुळे दुकानातून रेशन वाटप होत नाही, दुकानदार व कार्डधारक यांच्यामध्ये वाद निर्माण होत असतात. त्यामुळे रेशन व्यवस्थेत वितरण प्रणालीतील मशीन हे वादग्रस्त विषय ठरला आहे. तसेच दुकानदार व कार्डधारक दोघेही त्रस्त झाले आहेत कारण रेशन कार्डधारक धान्य घेण्यासाठी येताना आपली मजुरी सोडून धान्य घेण्यासाठी आलेला असतो व त्यांना दुकानावर मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे वेळेवर धान्य उपलब्ध होत नाही.तरी यावर ठोस असा उपाय म्हणून पीओएस मशीन पुरवणार्या कंपनीवर योग्य ती कारवाई करून, चांगल्या प्रतीच्या मशिन्स शासनाने पुरवाव्यात अशी मागणी रेशनधारकांकडून केली जात आहे.