Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»प्रांताधिकारी पाठोपाठ आता किनगाव सर्कलवर जीवघेणा हल्ला
    क्राईम

    प्रांताधिकारी पाठोपाठ आता किनगाव सर्कलवर जीवघेणा हल्ला

    saimat teamBy saimat teamMarch 2, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ः तालुका प्रतिनिधी
    फैजपूर प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्यावर गेल्या २४ फेब्रुवारी रोजी रात्री वाळू माफियांकडून जीवघेणा हल्ला झाला. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर चार दिवसात पुन्हा यावल तालुक्यात किनगाव येथील मंडळ अधिकारी सचिन तुळशीराम जगताप यांच्या छातीवर वाळू माफियाकडून जोरदार बुक्का मारून, शासकीय कामात अडथळा आणून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून यावल पो.स्टे.५ वाळू माफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे महसूल व पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
    यावल तालुक्यातील किनगाव मंडळ अधिकारी सचिन तुळशीराम जगताप यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.२८ फेब्रुवारी रोजी रात्री २१:४० वाजता तहसीलदार महेश पवार यांचे आदेशान्वये किनगाव मंडळ भागातील तलाठी टेमरसिंग बारेला,विलास भिकाजी नागरे,राजू आप्पा,काशिनाथ आप्पा, निखिल मिसाळ,गणेश वरहाडे,विजय साळवे यांचे समवेत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याचे कर्तव्य करीत असताना किनगाव बु. गावी सदर कार्यवाही कामी आम्ही गेलो असता चौकात उभे असताना जळगावकडून एक डंपर क्र.एमएच-१२-ऋन-८४२५ हे किनगावचे दिशेने येताना दिसले त्यास आम्ही आमची ओळख दर्शवून सदर वाहन थांबविण्याचा इशारा केला असता सदर वाहनावरील चालकाने डंपर न थांबविता तो सरळ किनगाव गावाचे दिशेने नेला तेव्हा सदर डंपरचा आम्ही आमचे जवळील वाहनाने पाठलाग करत असताना सदर डंपर किनगाव गावातील मशिदीजवळ गर्दी असल्याने तेथे थांबल्यावर सदर डम्पर वरील चालकास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव गणेश संजय कोळी रा.कोळन्हावी असे सांगितले.सदर चालकासोबत असलेले इसमाने त्याचे नाव विशाल कोळी रा.डांभुर्णी असे सांगितले.
    सदर चालकास मी मंडळाधिकारी किनगाव असल्याचे ओळख देऊन सदर डंपरची पाहणी करता सदर डंपरमधील गौणखनिज वाळू वाहतुकीचा परवाना पासबाबत विचारपूस करता त्याने काही एक माहिती सांगितली नाही.सदर विचारपूस सुरू असतांना तेथे टाटा कंपनीची मोटरकार क्र.एमएच-१९–झ-४१२८ मध्ये मी ओळखत असलेला गोपाळ प्रल्हाद सोळुंखे,संदीप आधार सोळुंखे,छगन कोळी असे आले.त्यातील गोपाळ कोळी हा मला म्हणाला की, तुम्हाला डंपर पकडण्याचा काही एक अधिकार नाही, तुम्ही डंपर का पकडले असे बोलून माझ्याशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला व माझ्या छातीवर जोरात बुक्का मारून व गाडीवर ढकलून दिले.त्यानंतर सदर वाद गावातील भूषण नंदन पाटील,सचिन रामकृष्ण नायदे,जहांगीर तुराब तडवी,लुकमान कलंदर तडवी व सोबतचे स्टॉपने सोडविले त्यानंतर सदर टाटा कारने आलेले इसम तेथून निघून गेले. त्यानंतर सदर डंपरचा पंचनामा करून सदर डंपर पुढील कार्यवाहीसाठी यावल पोलीस स्टेशनला आणत असताना साकळी गावाजवळील भोनक नदीच्या दिशेने सदर डंपर चालक गणेश कोळी याने डंपर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही सदर बाबत तहसीलदार यावल यांना सदर डंपर चालक डंपर पळवून नेत असल्याबाबतची माहिती दिली.नंतर ते सोबत समीर निजाम तडवी,ईश्वरलाल रमेश कोळी, शरद विठ्ठल सूर्यवंशी व हिरामण साळवे असे तहसील कार्यालयातील शासकीय वाहनाने तेथे आले व त्याचे मदतीने आम्ही सदर डंपर पुन्हा अडविले,त्यावेळी तेथे पुन्हा मोटर कार क्र.१९–झ-४१२८ ही आली.सदर कारमधील चालक गोपाळ प्रल्हाद सोळुंखे यांनी सदर कार ही भोनक नदी पात्रात कार्यवाही सुरू असताना सरळ माझे अंगावर घालून मला व स्टॉपला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.मी तात्काळ बाजूला झाल्याने तेथून वाचलो व त्यानंतर सदर कार तेथे थांबली व त्या कारमधील संदीप आधार सोळुंके रा. कोळन्हावी, जगन कोळी रा.डांभुर्णी यांनी सर्वांनी आम्हाला शिवीगाळ केली तोपर्यंत तेथे बराच स्टॉप जमल्याचे व पोलिस येत असल्याचे समजल्याने त्या सर्वांनी सदर डम्पर व कार तेथेच सोडून पळ काढला.
    त्यानंतर मी व स्टॉप कर्मचार्‍यांनी सदर डंपर व कार पोलिसांचे मदतीने यावल पोलीस स्टेशनला आणून जमा केली व सदर घटनेबाबत माहिती दिली.या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला गणेश संजय कोळी, गोपाल प्रल्हाद सोळुंखे, संदीप आधार सोळुंखे, विशाल कोळी, छगन कोळी या पाच जणांविरुद्ध भाग५ गु.र.नं.३५/२०२१ भा.द.वी. कलम ३०७, ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६, ३, १८८ सह महा.पोलीस अधिनियम १३५ सह महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८, (७) गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महसूल व पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Entrepreneur Attacked Brutally : उद्योजकावर जीवघेणा हल्ला ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

    December 18, 2025

    Jalgaon : विषारी औषध सेवन केल्याने तरूणाचा उपचारावेळी मृत्यू

    December 18, 2025

    Jalgaon : एका लाखासाठी विवाहितेचा छळ

    December 18, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.