जळगाव ः गणेश पाटील
चोपडा शिरपूर रस्त्यावर असलेल्या टोल नाक्याच्या शासकीय इमारतीत सार्वजानिक बांधकाम विभागाच्या एका उच्च पदस्थ अधिकार्याने दांडगाई करत अधिकाराचा गैरवापर करून भागीदारीने कॅन्टीनचा व्यवसाय सुरू केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. अखेर यासंदर्भात सायंदैनिक साईमतने वृत्त प्रकाशित केले होते. अखेर या वृत्ताची दखल वरिष्ठांना घेणे भाग पडले अन् सदरची हॉटेल सिल करण्याचे आदेश देण्यात आले व तशी तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतीत अनेक वेळा संबंधित खात्याचे जबाबदार अधिकारी गणेश पाटील यांना या ठिकाणचा सदरचा हॉटेल व्यवसाय बंद करण्यासंदर्भात शिवसैनिकांच्या मागणीवरून आमदार लताताई सोनवणे यांनी सूचना करूनही गणेश पाटील यांनी या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते .त्यामुळे शिवसैनिकात तीव्र संतापाची लाट उसळली होती.या उन्मत्त अधिकार्याच्या वागण्याविरोधात शिवसैनिकांनी देखील कार्यकारी अभियंता सोनवणे यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते शासकिय विश्रामगृहाच्या व्हीआयपी रूममध्ये वडापाव व मिसळचा व्यवसाय थाटण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे अधिकारी गणेश पाटील व शिवसैनिक यांच्यात जबर संघर्ष निर्माण झाला होता.
लोकप्रतिनिधींच्या सूचनेचा अनादर करणे, काम न करता बिले काढणे, दुसर्या अधिकार्याच्या अधिकार क्षेत्रांत हस्तक्षेप करून स्वतःच्या हस्ताक्षराने बिले काढणे, शासकिय पदावर असताना पदाचा गैरवापर करून शासकिय मालमत्तेचा दुरुपयोग करणे या सगळ्या गोष्टी वरिष्ठांच्या दृष्टीक्षेपात असतानाही संबंधितांकडून दुर्लक्ष का केले जात जाते? बांधकाम खात्याला नेहमीच वादाच्या भोवर्यात ओढणार्या अधिकार्याचे लाड कोणत्या अभिलाषेपोटी खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून केले जातात ? हे प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहेत.
