जळगाव ः प्रतिनिधी
युवा विकास फाउंडेशन व विष्णू भंगाळे मित्र परिवार जळगावतर्फे ऑनलाइन व्हिडीओ पद्धतीने हनुमान चालीसा पठण स्पर्धा २०२१’ घेण्यात आली. स्पर्धेत ५२७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून व्हिडीओ पाठवले. सोमवारी सरदार पटेल लेवा भवन येथे स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
स्वामी नारायण मंदिराचे स्वामी गोविंद प्रसाद महाराज, स्वामी नयनप्रकाशदासजी महाराज, आमदार सुरेश भोळे, भाईजी मुंदडा, नगरसेवक विष्णू भंगाळे, डॉ. स्नेहल फेगडे, ललित चौधरी, महेश पाटील, प्रा. सुरेश अत्तरदे, योगेश भावसार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. अनुपमा कोल्हे, स्वाती पगारे यांनी सूत्रसंचालन केले. राजेश वारके यांनी आभार मानले. कार्यक्रमास ललित महाजन, महेंद्र पाटील, एकनाथ पाचपांडे, चेतन पाटील, विवेक महाजन, नेमीचंद येवले, राहुल चौधरी, विक्की काळे, सचिन पाटील, विक्की भंगाळे आदींचे सहकार्य लाभले.
