जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मौलाना अबुल कलाम आझाद यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ इंगळे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमात सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय. एस. महाजन सर व मीनाक्षी चव्हाण यांनी मौलाना आझाद यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील केलेल्या कार्याची माहिती दिली.
यावेळी जयप्रकाश महाडिक, अरविंद बंगाली, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, अल्पसंख्याक महानगराध्यक्ष डॉ. रिजवान खाटीक, सलीम इनामदार, संजय चव्हाण, अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनिल माळी, दिलीप माहेश्वरी, राजू तडवी, राजू बाविस्कर, सचिन चव्हाण, ममता तडवी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
