जळगाव : प्रतिनिधी
कामगार नेते रविंद्र सपकाळे यांच्या १७ व्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कामगारांना मास्क वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, बारदान व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदू राठी, उपसभापती इंद्रराज सपकाळे, हमाल मापाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉमेश सपकाळे, सरचिटणीस शरद चौधरी, नंदू पाटील, शशी बियाणी, सुकदेव शेळके, बन्सी खरात, अंबादास बटुळे, अजिनाथ जपकर, विश्वनाथ बोरुडे, अरुण राजपूत यांच्यासह कामगार उपस्थित होते.
