भुसावळ : प्रतिनिधी
अवधुतांच्या कृपाशिर्वादाने येथील खळवाडी परिसरातील श्रीपंत मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा साजरा होत असून या निमित्ताने आजपासून श्रीपंत गुरुचरित्र पोथी पारायणाची सरुवात करण्यात आली असून त्यांची सांगता २५ रोजी श्रीपंत मंदिराच्या वर्धापनीदिनी होणार आहे. पारायण प.पू.सुपडूमामा हंबर्डीकर यांच्या वाणीमधून होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी पारायणास बसणार्या भाविकांना सुरक्षित अंतर ठेवत बसविले असून सॅनिटायझर व मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.
शहरातील खळवाडीमधील वेडीमाता मंदिर रोडवरील (बाबा टेन्ट हाऊस अॅन्ड कॅटर्सजवळ) श्रीपंत मंदिराचा वर्धापन दिन २५ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. नऊ वर्षापूर्वी माघ शुक्ल १३ दि.२५ फेब्रुवारी २०१२ रोजी श्री सद्गुरु पंत महाराजांच्या फोटोचे अनावरण करत श्रीपंत मंदिराची स्थापना झाली होती. त्यानंतर आजतागायत याठिकाणी भाविक विविध धार्मिक कार्यक्रम असतात. श्रीपंत मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून उत्सवास सुरुवात करण्यात आली आहे. या उत्सवात प.पू.सुपडूमामा हंबर्डीकर यांच्या वाणीतून श्रीपंत गुरुचरित्र पोथी पारायण होत आहे. पारायणाच्या प्रारंभ प्रसंगी प.पू. स्वरुपानंद महाराज (डोंगरदे), श्रीक्षेत्र डोंगरदेचे मा.अध्यक्ष डॉ.शिवराम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पारायण २२ ते २४ दरम्यान होत असून दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ५ ते ६ काकड आरती, सकाळी ९ ते १२ पारायण, दुपारी २ ते ५ पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० हरिनाम नामसंकिर्तन असा दैनंदिन कार्यक्रम आहे.
आज २२ रोजी किर्तनकार हभप संजय महाराज बामणोदकर, २३ रोजी किर्तनकार प.पू.सुपडूमामा महाराज हंबर्डीकर, २४ रोजी किर्तनकार हभप दिपक महाराज शेळगावकर यांचे किर्तन होणार आहे. तर २५ रोजी सकाळी ८ वाजता हभप भरत महाराज म्हैसवाडीकर यांचे काल्याचे किर्तन होईल. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान बोधसत्राचा कार्यक्रम होणार असून यात मणिष महाजन, कल्पना अत्तरदे, कोमल झांबरे, ज्योती चौधरी, राहुल बनकर, विणा झांबरे, लता पाटील, पोपट पिंपळे, शिवराम कोळी, सुपडूमामा, प.पु. शेलारमामा, प.पु. दत्ताजी झेमशे, प.पु. तुळशिराम तमखाणे, प.पु.सुधिरपंत बाळेकुंद्री यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी श्रीपंत मंदिराचा वर्धापन दिन साजरा करीत असतांना सकाळी ८ वाजता नामस्मरण, मौननामस्मरण, ११.३० ते १२ महाआरती व दुपारी १२ ते २ दरम्यान महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. पोथीसाठी दिलीप वामन पाटील यांच्याकडून कै.वामन जंगलू पाटील यांचे स्मरणार्थ ५१ पोथ्या देण्यात आल्या आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी पारायणास बसणार्या भाविकांना सामाजिक अंतर राखत पारायणास बसवले आहे. तसेच येथे येणार्या प्रत्येक भाविकाला मास्क अनिवार्य केले आहे व कार्यक्रमस्थळी सॅनिटायझर व मास्कची व्यवस्थासुध्दा केली आहे. कार्यक्रमास माजी नगरसेवक वसंत पाटील, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, सतिष सपकाळे, दिपक धांडे, प्रभाकर नारखेडे, भगवान पाटील, पोपट पिंपळे, शिवराम कोळी, मामा पाचपांडे, विलास भैय्या यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. तसेच आज सकाळी मुंबई येथील कुंदन तुकाराम पाटील यांच्याकडून नास्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर २३ रोजी भुसावळ येथील मामा पाचपांडे यांच्याकडून नास्त्याची व्यवस्था होणार आहे. २२ रोजीचे दुपारचे भोजन मोहीत टेन्ट हाऊसचे संतोष पाटील यांच्याकडून तर संध्याकाळचे भोजन कै. अलका यशवंत भोळे यांच्या स्मरणार्थ आकाश भोळे यांच्याकडून आहे. २३ रोजी दुपारचे भोजन कै.मनोहर बर्हाटे यांच्या स्मरणार्थ दिपक बर्हाटे यांच्याकडून तर संध्याकाळचे भोजन कै. अरुण पाटील यांच्या स्मरणार्थ मनिषा व प्रशांत पाटील यांच्याकडून आहे. २४ रोजी दुपारचे भोजन राहुल पाटील व पाटील परिवार यांच्याकडून तर संध्याकाळचे भोजन कै.संतोष भंगाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोपाळ भंगाळे यांच्याकडून आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उध्दव झांबरे, सुपडूमामा भिरुड, शिवराम कोळी (कडगाव), देवचंद मराठे (भडगाव), भगवान पाटील, विलास चौधरी (जळगाव), लक्ष्मीकांत इंगळे, अनिल चौधरी (सफाळे), डिगंबर नेहेते, रुपेश झांबरे यांच्यासह भुसावळ, भालोद, बामणोद, डोंगरकठोरा, जळगाव, कडगाव, सावदा, सफाळा, मुसळी, चुंचाळे, लालबाग, जोगलखेडा, भडगाव, चिनावल, डोंगरदे, सांगवी, फैजपूर व नाशिक येथील पंतभक्त मंडळी परिश्रम घेत आहे.