सोशल डिस्टनसिंग व दक्षताबाबत नवनिर्वाचित प्रशासकांची पहाटे बाजार समितीत भेट

0
25

चाळीसगाव ः प्रतिनिधी
नुकतीच दोन दिवसांपूर्वी राज्य शासन व पणन महामंडळाच्या वतीने चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यात मुख्य प्रशासक म्हणून दिनेश पाटील यांच्यासह १७ जणांची नियुक्ती करण्यात आली. कोविड संसर्गामुळे तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे ही बाब लक्षात घेता आज पहाटे ६ वाजता नूतन प्रशासकांनी भेट देत सर्वांना अचंबित केले.यावेळी ईश्वरसिंग ठाकरे, संजय चव्हाण, भीमराव खलाणे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कोतकर आदी उपस्थित होते
मास्क लावा, काळजी घ्या अशा प्रकारच्या सुचना देत विक्रीसाठी भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकर्‍यांशी हितगूज केले. योग्य भाव मिळतो का?काही अडचणी आहेत का?असा संवाद साधत व्यापारी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या.सोशल डिस्टनसिंगमध्ये बाजार भरवावा,स्वतंत्र पार्कींग व्यवस्था करावी व स्वच्छतेच्या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा अशा स्वरुपाची मागणी यावेळी उपस्थितांच्या वतीने करण्यात आली
भल्या पहाटे प्रशासकांनी दिलेल्या भेटीची सर्वांनी प्रशसा केली व अल्पकालावधीसाठी मिळालेल्या संधीचे सोने करुन बाजार समितीचे रुप पालटून दाखवू असा विश्वास नवनिर्वाचित मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here