जळगाव : प्रतिनिधी
येथील सेवा स्पंदन आयोजित अलंकार ऑनलाईन फोटो स्पर्धेत अश्विनी तांबट (पुणे) यांनी प्रथम तर अश्विनी कुळकर्णी (औरंगाबाद) हिने द्वितीय आणि कल्याणी देशमुख (नाशिक) यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिके प्राप्त करीत विजेतेपदाचा सन्मान प्राप्त केला. जोशी बंधू जेम्स ऍण्ड ज्वेलरीचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले.
१८ ते ६० वर्षे आणि ६० वर्ष व त्यावरील अशा दोन गटांचे परिक्षण स्वामिनी फेम अभिनेत्री रेवती लेले, झी युवा वाहिनीच्या एक्झकेटिव्ह प्रोड्युसर ऋतुजा जोशी यांनी केले. दुसर्या गटात कुमुदिनी पाटील (पाचोरा), निलीमा चित्रे (बदलापूर), रेखा कुळकर्णी (जळगाव) आदिंनी परितोषिकांचा गौरव प्राप्त केला. सर्वाधिक वयाच्या स्पर्धक प्रमिला येवले (वय ८०, जळगाव),स्व.रजनी दलाल(मरणोत्तर,पाचोरा),संध्या कौल (विशेष अलंकार,जळगाव) यांना ‘विशेष सन्मान’ पुरस्कार देण्यात आले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून जोशी बंधू जेम्स ऍण्ड ज्वेलरीचे संचालक विनीत जोशी, क्लासिक आर्टचे संचालक हेमचंद्र काळुंखे, ब्रह्मदंडचे संपादक अजय डोहोळे, सेवा स्पंदनच्या सचिव व स्पर्धा संयोजक अनघा डोहोळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. स्पर्धकांच्या वतीने संध्या कौल व रेखा कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. स्व.रजनी दलाल या हृदयविकाराने निधन झालेल्या स्पर्धक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमास अरुण जोशी, ऊषा डोहोळे, मिनाक्षी कुळकर्णी, जयश्री जोशी यांच्यासह स्पर्धक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.