चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासनाच्या आदेशानुसार अशासकीय प्रशासक म्हणून एकूण १८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.या सदस्यांनी काल आपल्या पदाचा पदभार स्विकारला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाची निवड २०१५ ते २०२० या कालावधीपर्यंत घेण्यात आली होती. यात सोसायटी हमाल मापाडी, व्यापारी, तज्ञ यासह अन्य अशा १८ सदस्यांची निवड करण्यात आली होती.त्यानुसार १९ सप्टेंबर २०२० रोजी या संचालक मंडळाचा कालावधी संपला होता. त्यानुसार २१ सप्टेंबर २०२० पासून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीची नेमणूक करण्यात आली होती.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजीपाला, गुरांची खरेदी-विक्री, धान्य, कांदा बाजार व अन्य शेती मालाच्या उलाढालीमध्ये सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखली जाते. याचा उत्पन्नाचा आलेख देखील मोठा असून संचालक मंडळात देखील १८ सदस्य आहेत.२१ सप्टेंबरपासून प्रशासक बसले होते.त्यानंतर चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी असे पत्रक मंत्रालयाकडून जिल्हा उपनिबंधकाकडे प्राप्त झाले. ते पत्रक चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पाठविले.त्या अनुषंगाने चाळीसगावात असहकार १८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
गोकुळ कोल्हे यांचा सत्कार
संचालक गोकुळ कोल्हे यांचा चाळीसगाव तालुक्यासह खडकी बु गावातील मनाजी तांबे, अर्जुन पवार, मोतीलाल मांडोळे, सुजित गायकवाड, नानासाहेब तांबे, तुषार तांबे, बापू मांडोळे, मुश्ताक खाटीक, मुराद पटेल, फिरोज पटेल, आरिफ खाटीक, विजय गायकवाड, रवि घोडके यांच्या सह महाविकास आघाडीचे पदाअधिकारी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.
अशी आहे अशासकीय पदाधिकार्यांची नावे
दिनेश साहेबराव पाटील (मुख्य प्रशासक), ईश्वरसिंग प्रतापसिंग ठाकरे, आबासाहेब पंढरीनाथ निकम, भास्कर बाबुराव पवार, संजय भिकारी चव्हाण, भिमराव हरी खलाणे, गोकुळ जनार्दन कोल्हे, नकुल रोहीदास पाटील, तुकाराम रामभाऊ पाटील, नेताजी बारीकराव वाघ, सुभाष राजाराम खंडाळे, दगडू सुका दणके, अनुराधा महेंद्र पाटील, निर्मलाबाई धर्मा काळे, संजय रामदास जाधव, रमेश रघुनाथ सोनगिरे, बापुराव गिरधर चौधरी, मधुकर भिला कडवे.
