जळगाव : प्रतिनिधी
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांची काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचारादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये कोरोनाची तपासणीही करण्यात आली होती. या तपासणीत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, खा.खडसे यांनी तीन दिवसांपूर्वी वाढीव विज बील तसेच शेतकर्यांच्या प्रश्नांवरुन मुक्ताईनगर येथील आंदोलनात भाग घेतला होता. खा.खडसे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाच्या तपासण्या कराव्यात असे आवाहन केले आहे.