जळगाव : प्रतिनिधी
उद्योजक रविंद्र लढ्ढा यांची सुकन्या डॉ. पायल लढ्ढा हिच्या लग्नानिमित्त लढ्ढा परिवारातर्फे भरारी फाउंडेशनच्या शेतकरी संवेदना अभियानांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या चार कुटुंबियांना मसाला व पीठ दळण्याचे यंत्र (चक्की) भेट देण्यात आले.
ज्योती मेढे (धामोडी ता. रावेर), अनिता वंजारी (तरडी, ता. पारोळा), सोनाली पाटील (खेडीढोक ता. पारोळा) व मनीषा पाटील (शिरसोदे ता. पारोळा) या आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या महिलांना दळण यंत्र (चक्की) देण्यात आले.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, चिटणीस पंकज लोखंडे, रवी लढ्ढा, ज्योती लढा, श्रीराम पाटील, धनंजय खडके, राजेश न्याती, भरारीचे दीपक परदेशी, विनोद ढगे, सचिन महाजन, सुदर्शन पाटील, दुर्गेश आंबेकर, बंडू पाटील, मोहित पाटील आदी उपस्थित होते.