निशाणे येथील महालक्ष्मी माता मंदिर प्रकट दिन व यात्रोत्सव यंदा रद्द

0
30

जळगाव : प्रतिनिधी
श्री महालक्ष्मी माता मंदिर ट्रस्ट निशाणे, ता.धरणगाव, जि.जळगाव या मंदिरातर्फे सालाबादाप्रमाणे प्रकट दिन व यात्रोउत्सव आयोजित करण्यात येत असतो. या वर्षी दि.२५ फेब्रुवारी रोजी सदरच्या तिथीप्रमाणे साजरा होणारा उत्सव, कोव्हीड-१९ म्हणजेच कोरोनाचा प्रार्दुभाव असल्यामुळे तसेच वेळोवेळी दिलेल्या शासनाचे आदेश व निर्देशानुसार व जिल्हाधिकारी जळगाव यांनी दि.२८ फेब्रुवारी पर्यंत प्रतिबंध लादल्यामुळे या वर्षी मंदिराच्या परिसरात प्रकट दिन व यात्रोउत्सव आयोजित/साजरा केले जाणार नाही.
तरी खेळणी, हॉटेल व इतर दुकानदारांनी मंदिराच्या परिसरात दुकाने लावू नये तसेच व्यवस्थापनाला व प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचप्रमाणे नागरिकांनी दर्शनासाठी सामाजिक अंतर पाळून, मास्क लावून, सॅनिटायझर करुन, गर्दी न करता दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील मंदिराचे मुख्य विश्वस्त, पदाधिकारी व विश्वस्तांनी केले आहे. नागरिकांनी व भक्तांनी सहकार्य करावे. आपण सहकार्य न केल्यास शासन/प्रशासनतर्फे त्यांच्या स्तरावर आपल्यावर कार्यवाही केली जावू शकते असा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here