सरदार वल्लभभाई पटेल शिक्षण मंडळाची निवडणूक बिनविरोध

0
38

जळगाव ः प्रतिनिधी
येथील सरदार वल्लभभाई पटेल शिक्षण मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी पंडित अटाळे, उपाध्यक्षपदी प्रमोद पाटील तर सचिवपदी मिना लोखंडे यांची बिनविरोध निवड झाली.
एमआयडीसीतील सुप्रिम कॉलनीतील शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या सरदार वल्लभभाई पटेल शिक्षण मंडळ या संस्थेची २०२० ते २०२५ या कालावधीसाठी नुकतीच निवडणुक पार पडली. संस्थेची निवडणूक प्रक्रिया अविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र रघुनाथ अत्तरदे यांनी काम पाहिले तर त्यांना सागर इच्छाराम झांबरे यांनी मदत केली. संस्थेच्या कार्यकारणीत अध्यक्षपदी पंडित बाजीराव अटाळे, उपाध्यक्षपदी प्रमोद जगन्नाथ पाटील, सचिवपदी मिना दिनकर लोखंडे, सहसचिव हितेंद्र शंकर पाटील, खजिनदार राज पुरुषोत्तम चौधरी, शालेय समिती चेअरमनपदी चारुदत्त विजय पाटील तर संचालक पदी शंकर हरी पाटील, मुरलीधर बंडू अत्तरदे, भुवनेश्वरी विजयसिंग पाटील, शिरीष पुरुषोत्तम आकुलकर, राजेंद्रराव आनंदराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकार्‍यांसह संचालकांवर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here