परिवर्तन दशकपूर्तीच्या चित्रप्रदर्शनात खान्देशातील ३५ चित्रकारांचा सहभाग

0
16

जळगाव ः प्रतिनिधी
पु. ना. गाडगीळ गॅलरीत परिवर्तनच्या दशकपूर्ती निमित्ताने खान्देशातील ३५ चित्रकारांनी एकत्र येऊन शोध’ चित्रप्रदर्शनात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ चित्रे रेखाटून परिवर्तनच्या दर्शपूर्तीला अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी महापौर भारती सोनवणे यांनी कॅनव्हासवर चित्र रेखाटून केले. या उपक्रमास चित्रकार राजू बाविस्कर, राजू महाजन, विजय जैन, विकास मलारा, नितीन सोनवणे, प्रदीप पवार, यशवंत गरूड, श्याम कुमावत आदीसह ३५ चित्रकार राबवत आहे.
परिवर्तनच्या दशकपूर्ती निमित्ताने खान्देशातील ३५ चित्रकारांनी आपली एकत्र मोट बांधत परिवर्तनच्या कार्याला मानवंदना म्हणून शोध’ हे चित्रप्रदर्शन रविवारी भरवण्यात आले. सर्व चित्रकारांनी एकत्र येऊन परिवर्तनच्या १० वर्षांचा प्रवास जाणून घेत रंगमंचावरील काळ व अवकाश या सोबतच प्रकाश व काळोख यांना केंद्रस्थानी ठेवून ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ चित्रांची निर्मिती केली.
महापौर भारतीताई सोनवणे यांनी रेखाटलेले अर्ध चित्र उपायुक्त प्रशांत पाटील, प्रा. राजेंद्र पाटील, सुधीर भोंगळे, शंभू पाटील, विजय वाणी आदींनी पूर्ण केले.या वेळी तरुण भाटे, सुशील चौधरी, निरंजन शेलार, प्रशांत तिवारी, वसंत नागपुरे, पंकज नाकपुरे, सुबोध कांतायन, वंदना परमार्थ, मनोज जंजाळकर, अविनाश मोघे, सुनील तारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here