जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जनता सहकारी बँकेने सर्वसामान्य जनतेचा सामाजिक,सांस्कृतिक व आर्थिक आशय जपत प्रगति केली असून बँकेने नुकताच रु.३००० कोटी एकत्रित व्यवसायाचा टप्पा गाठला आहे तसेच सामाजिक गरज ओळखून बँक आपले धोरण ठरवीत असते व त्या अनुषंगाने समाजाच्या गरजा पूर्ण करण्यावर बँकेचा भर असतो असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष श्री अनिल राव यांनी आपल्या मनोगतात केले.
काल रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल,जळगाव येथे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली.सभेस सुमारे ७०० सभासद उपस्थित होते. बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश आचार्य यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर बँकेची प्रगती सुरु असून समाजातील शेवटच्या घटकाला सक्षम करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. बँकेच्या प्रगतीत बँकेचे स्थापनेपासूनचे सर्व संचालकांनी खूप मोठे काम केले आहे तसेच सभासद व कर्मचारी यांचे देखील बँकेच्या प्रगतीत योगदान आहे.तसेच स्व.दादांनी सामान्य व्यक्तींना एकत्रित करून असामान्य असे कार्य केले आहे. असे प्रतिपादन जळगाव
जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी आज बँकेच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.
आपल्या मनोगताच्या सुरवातीस बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी केशवस्मृती व बँक परिवारात ज्यांचे अमूल्य योगदान राहिले अशा दिवंगत मान्यवर व्यक्तींप्रती आदरयुक्त कृतज्ञता व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.कोरना काळात बँकेचे कर्मचारी वर्गाने अमूल्य असे योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले या कठीण काळात कर्मचारी वर्ग व त्यांचे कुटुंबिय हे तणावाखाली होते परंतु अशा परिस्थितीत बँकेच्या संचालक मंडळाने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धीर देऊन त्यांचे मनोबल वाढवले व कर्मचारी वर्गाने देखील या कठीण काळात चांगली सेवा देऊन बँकेच्या प्रगतीत हातभार लावला याबद्दल त्यांनी कर्मचारी वर्गाचे कौतुक केले.
कोरोंना काळात बँकेने सामाजिक बांधीलकी देखील जोपासली. कोरोंनाच्या कठीण काळात बँकेने ज्यावेळी पीपीई किट उपलब्ध होत नव्हते अशा परिस्थितीत जळगाव येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सेस यांचेसाठी पीपीई किट ची व्यवस्था केली तसेच गरीब कुटुंबीयांना सुमारे २ लाखांचे रेशन साहित्याचे मोफत वाटप केले. कोरोंना काळात लहान व्यवसायिकांसाठी विविध योजना राबविल्या. अशा वेळी समाजाची गरज ओळखून बँकेने विविध कर्ज योजना अमलात आणल्या व त्यांच्या माध्यमातून लहान व्यवसायिकांना आर्थिक आधार देऊन त्यांना पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्यासाठी मदत केली यात स्वयंसिद्धा कर्ज योजना,सक्षम कर्ज योजना यासारख्या कर्ज योजनाच्या माध्यमातून लहान व्यावसायिकांना आर्थिक मदत केली यातून सुमारे १००० कुटुंब बँकेने पुन्हा उभे केले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्याने यासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य कमीत व्याजदराने उपलब्ध करून दिले याचा देखील लाभ मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी घेतला.तसेच या काळात ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडू शकत नव्हते त्यांचेसाठी घरपोच बँकिंग सुविधा सुरू केली.
डिजिटल तत्रज्ञानावर भर आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री अनिल राव नमूद केले की ऑनलाइन व्यवहार करणार्या खातेदारांची संख्या देखील वाढत असून त्यांनी मागील वर्षी एटीएम ,चेलळश्रश -िि,ठढॠड/ छएऋढ या द्वारे डिजिटल व्यवहार करण्यार्या खातेदारांची आकडेवारी नमूद केली. बँकेने नेट बँकिंग साठी सुरक्षेच्या दृष्टीने लागणारे निकष जवळपास पूर्ण केले असून लवकरच बँकेची नेट बँकिंग सुविधा सुरू होणार आहे असे त्यांनी नमूद केले. तसेच ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून ऑनलाइन फ्रोड चे देखील प्रमाण वाढत आहे यासाठी ग्राहकांना जागरूक करण्यासाठी अभियान राबविले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिला सक्षमिकरण बँकेचे महिला बचत गत खूप ताकदीने काम करीत असून बँकेच्या बचत गटांना दिलेल्या कर्ज खात्यांची थकबाकी शून्य असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच नाबार्ड ने बँकेच्या बचत गटांच्या कामाची दखल घेऊन र्र्िीेींं; ई शक्ति र्र्िीेींं; प्रोजेक्ट साठी बँकेची निवड केली व त्या माध्यमातून बचत गटांचे डिजीटायजेशन झाले असून त्यामुळे सुमारे २५००० महिला याद्वारे जोडल्या गेल्या आहेत.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या ( नाबार्ड ) सॅनिटरी नॅप्किनच्या पायलट प्रोजेक्ट साठी महाराष्ट्रातून जळगाव जनता बँकेची निवड झाली असून बँकेच्या झाशीची राणी महिला बचत गटाची या कामासाठी निवड झाली आहे यासाठी या गटास अनुदान मिळाले असून त्यांच्या सदस्यांना याचे प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.
आरोग्य विषयक सभासदांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाखा स्तरावर देखील आरोग्य तपासणीची सुविधा सभासदांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बँकेतर्फे अफेरेसिस मशीन केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीस रुग्णांच्या सेवेकरिता नुकतेच भेट देण्यात आले आहे डेंग्यू, विषारी मलेरिया, अतिरक्तस्त्राव या सारख्या आजारावर प्लेटलेट ची आवश्यकता असते, रक्तातील प्लेटलेट्सची संख्या अतिशय कमी झाल्यास शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते व रुग्ण गंभीर अवस्थेत जाऊ शकतो अशा वेळी सिंगल डोनर प्लेटलेट देणे आवश्यक असते. सिंगल डोनर प्लेटलेट तयार करण्याची प्रक्रिया अफेरेसीस मशीन द्वारे केली जाते, बँकेच्या सभासदांना स्वत:साठी अथवा त्यांचेवर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस सवलतीच्या दरात ही सेवा उलब्ध करून दिली जाणार असून या रक्तघटक पिशवीसाठी जो दर असेल त्याच्या सवलतीच्या दरात सभासदांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सामाजिक आयाम आपल्या मनोगतात श्री अनिल राव यांनी केशवस्मृति प्रतिष्ठान ने नुकत्यास लोकार्पण केलेल्या गॅस शवदाहिनीची माहिती उपस्थितांना दिली. नैसर्गिक समतोल राखण्याच्या दृष्टीने व सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा दरात केशवस्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून गॅस शवदाहिनी सुरू करण्यात आली असून त्यामुळे नक्कीच नैसर्गिक समतोल राखण्यास मदत होईल असे त्यांनी नमूद केले.
आपल्या मनोगतात शेवटी अनिल राव यांनी बँक प्रगती करताना स्थैर्य देखील ठेवते त्यामुळे बँकेने जी प्रगती केली आहे ती कायम ठेऊन ती अधिक सक्षम करणे हा बँकेचा हेतु आहे व स्थिर प्रगती हेच बँकेचे धोरण असणार आहे व त्यामुळेच दीपस्तंभासारखी बँक अशी बँकेची ओळख आहे असे त्यांनी नमूद केले.वर्षा भांडारकर यांच्या वंदेमातरम्ने सभेची सुरुवात झाली. सभेचे सूत्र संचालन संचालक डॉ.अतुल सरोदे यांनी केले.
अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या महनीय व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.बँकेचे लेखापाल प्रकाश पाठक यांचा सत्कार बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांच्या हस्ते करण्यात आला.यानंतर विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलीक पाटील व संचालक जयेश दोशी, बन्सीलाल अन्दोरे, सतीश मदाने , सुरेश केसवाणी, दीपक अट्रावलकर, रविंद्र बेलपाठक , जयंतीलाल सुराणा, सुभाष लोहार, विवेक पाटील, डॉ.अतुल सरोदे, हरिशचंद्र यादव, सावित्री सोळुंखे, डॉ.आरती हुजुरबाजार यांनी केले व त्यास उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी व्यासपीठावर तज्ञ संचालक विद्याधर दंडवते व आमंत्रित संचालक नितिन झंवर व लताताई इंगळे,कर्मचारी प्रतिंनिधी हेमंत चंदनकर व ओंकार पाटील उपस्थित होते.
बँकेच्या सन २०१९-२० या वर्षातील आर्थिक आकडेवारीचे झेुशीिेळपीं झीशीशपींरींळेप संचालक कृष्णा कामठे यांनी केले तर आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष डॉ.श्री प्रताप जाधव यांनी केले. प्रार्थनेने सभेची सांगता झाली. या वेळी बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला,केशवस्मृति सेवासमूहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर तसेच माजी संचालक व व्यासपिठावर बँकेच्या विविध शाखांचे शाखा विस्तार समिति सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयत्या वेळच्या विषयात बँकेचे सभासद सोनार सर व राजेंद्र नन्नवारे व उपस्थित सभासदांनी कोरोना काळात बँकेने केलेल्या कामासाठी संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला व त्यास सर्वानुमते मंजूरी मिळाली तसेच उपस्थित काही सभासदांनी विद्यमान संचालक मंडळास त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन केले.