महाराष्ट्र राज्य वेटलँड प्राधिकरणाची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाली. बैठकीस पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव तथा प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा श्रीमती मनिषा म्हैसकर, पर्यावरण संचालक नरेद्र टोके, पर्यावरण विभागाचे उपसचिव जॉय ठाकूर उपस्थित होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांच्यासह प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते.
पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री तथा महाराष्ट्र राज्य वेटलँड प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री.ठाकरे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवन संरक्षणाचा मुद्दा राज्य शासनाने अग्रक्रमावर घेतला आहे. त्याच पद्धतीने राज्यातील वेटलँडस् चे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक असून यासाठी हा मुद्दाही अग्रक्रमावर घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्यात येईल. ‘नॉट वेटलँड’ म्हणून पडताळणी झालेल्या सर्व साईटस् ची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात यावी, अशा सूचना श्री.ठाकरे त्यांनी दिल्या.
वेटलँडमध्ये कोणत्या साईटचा अंतर्भाव करावा याबाबत स्पष्टता येण्यासाठी तसेच याबाबत प्रबोधन आणि मार्गदर्शन होण्याच्या अनुषंगाने या विषयाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा घेण्यात याव्यात. शिवाय पर्यावरण जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या माझी वसुंधरा अभियानामध्ये वेटलँड जतन आणि संवर्धनाचा मुद्दाही समाविष्ट करण्यात यावा, अशा सूचनाही श्री.ठाकरे यांनी दिल्या.