आत्महत्याग्रस्त शेतकर्यां च्या कुटुंबियांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश व साहित्याचे वाटप

0
21

जळगाव ः  प्रतिनिधी 

घरातील कर्त्या व्यक्तींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता शासनाच्यावतीने अर्थसहाय्य देण्यात येते.आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदत व्हावी, यासाठी मिनाबाई पाटील अहिरे, वंदना पाटील वाकटुकी, सुमनबाई प्रकाश पाटील, रोटवद यांना  जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासनाच्या वतीने प्रत्येकी एक लाख रूपयांच्या धनादेशाचे, पिठाची गिरणी व किराणा साहित्य वाटप करण्यात आले.

२० महिलांना धनादेश वाटप

धरणगाव तालुक्यातील पाळधी बु., जुनागड बंगाली अहिरे बु, साकरे, बांभोरी प्र.चा. वाघळूद खुर्द, वराड बु., बोरगाव बु., पिंप्री खुर्द,  हनुमंतखेडा, पिंपळेसिम व धरणगाव येथील २० महिलांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत प्रत्येकी ३० हजार रुपयांचा धनादेश याप्रमाणे ६ लाखाचा धनादेश, एक महिन्याचे किराणा साहित्य व साडीचोळीचे  वाटप पालकमंत्री  ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आणि गुलाबराव वाघ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उभारी कार्यक्रमातंर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, गरजूंना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील केले.

यावेळी गुलाबराव वाघ, पं. स. सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि.प.सदस्य गोपाल चौधरी, प्र.नगराध्यक्षा कल्पना महाजन, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार सातपुते, गणेश पवार, सुरेश नाना चौधरी, पी. एम.पाटील, अंजलीताई विसावे, राजेंद्र महाजन, प्रेमराज पाटील यांच्यासह लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी तर प्रास्ताविक तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here