‘लोकरंगभूमी’ या पुस्तकाचे जामनेर येथे प्रकाशन

0
26

जामनेर ः प्रतिनिधी

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वरिष्ठ विभागात कार्यरत असलेले प्रा. डॉ. विजयेंद्र विश्वनाथ पाटील सहाय्यक प्राध्यापक मराठी यांचे ‘लोकरंगभूमी’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन नुकतेच झाले. सदर प्रकाशन हे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, प्रशांत पब्लिकेशन्सचे संचालक प्रदीप पाटील, उपप्राचार्य डॉ.आर.एस.खडायते यांच्या हस्ते झाले. ‘लोकरंगभूमी’ हे पुस्तक तृतीय वर्ष कला शाखेसाठी मराठी विषयांसाठी उपयुक्त आहे. त्याचसोबत विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक आहे.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अक्षय घोरपडे यांनी केले. यावेळी पुस्तकाचे लेखक डॉ. विजयेंद्र पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी पुस्तक लेखनाबद्दल शुभेच्छा देवून लोकरंगभूमी व आजचे विज्ञान युग याबद्दल मत व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.विजयेंद्र पाटील यांना शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here