मुक्ताईनगर येथे आधार लिंकचा घोळ

0
31

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी

मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक रेशन कार्ड लाभार्थी यांचे आधार लिंक इतर जिल्ह्यात झालेले आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारी व निवेदने देवूनही पुरवठा विभाग कोणतीही कारवाई करीत नाही. पुरवठा विभागात नवीन रेशन कार्ड काढताना अनेक अडचणी, आधार सीडिंग  तसेच स्वस्थ धान्य दुकानावर धान्य कमी मिळणे आदी तक्रारी व निवेदने देवूनही मुक्ताईनगरच्या तहसीलदार अडचणी सोडविण्यास सपशेल अपयशी ठरल्याने दिव्यांग व्यक्तींना शासकीय परिपत्रकानुसार स्वतंत्र लाभार्थी कार्ड बनविणे आणि विधवा महिलांचे प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड बनविणे या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना महिला आघाडीतर्फे संविधानिक मार्गाने शिवसेना स्टाईल प्रचंड निदर्शने आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाट, तालुका संघटक शोभा कोळी, शहर संघटक सरीता कोळी, उज्वला सोनवणे, माजी ग्रा.पं.सदस्या अनिता मराठे, शारदा भोई यांच्यासह सुनंदा घुले, लता घुले, कल्पना तायडे, नर्मदाबाई गोसावी, भारती जयकर, विमलबाई गायकवाड, सरीता शिंगोटे, सिताबाई माळी, अलका मराठे, संगीता मराठे, यमुना मराठे, सरला माळी, वैशाली दैवे, देवकाबाई मराठे, कस्तुराबाई मराठे, पुष्पाबाई मराठे, अनिता माळी, संगीता खराटे, ललिता खराटे, अनिता बोदडे, राजश्री बोदडे, रेखा खुळे, मंगला धनगर, शोभा गायकवाड, सुनंदा मराठे, कमलबाई मराठे, अनुसयाबाई लोण, शोभा माळी, ज्योत्सना माळी, अलका कांडेलकर, भावना गायकवाड, सुरेखा माळी, रेणुका कासार, भिकाबाई दैवे, सुलभा कोळी, ज्योती कोळी, उषा पाटील, नंदा मराठे, कांता इंगळे, आशा इंगळे, सरूबाई सोनवणे, वर्षा पाटील, प्रमिला पवार, आशाबाई ठाकरे, इंदिरा वाघ, रेखा ठाकरे, सुमित्रा इंगळे, चिंधाबाई बोदडे, कल्पना पाटील, कांताबाई सुनील इंगळे, माउराबाई ठाकरे आदी महिला पदाधिकार्‍यांसह शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे, युवासेना तालुका प्रमुख पंकज राणे, राजेंद्र तळेले, बाळा भालशंकर, प्रकाश गोसावी तसेच आधार लिंकच्या घोळामुळे त्रस्त झालेले नागरिक व महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here