Airtel यूजर्स सावध व्हा, २५ लाख युजर्संचा डेटा लीक

0
22

 एअरटेल युजर्सला आता आणखी सावध राहण्याची गरज आहे. नुकताच एक रिपोर्ट आला असून यात एअरटेलच्या नंबर्सचा डेटा लीक झाला आहे. यात युजर्संचे नंबर, नाव, पत्ता, शहर, आधार कार्ड नंबर, महिला-पुरूष यासारख्या माहितीचा समावेश आहे. हॅकर्सने २.५ मिलियन म्हणजेच २५ लाख युजर्संचा डेटा आपल्याकडे ठेवला आहे. हॅकर्सच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडे भारतातील सर्व एअरटेल युजर्सचा डेटा आहे. व त्याला विक्री करायचा आहे. जर असे झाले तर एअरटेल युजर्स साठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

IANS च्या रिपोर्टनुसार, डेटा डंप च्या डिटेल्सला व्हेरिफाय करण्यात आले आहे. ज्यात अनेक नंबर्स एअरटेल युजर्सचे आहेत. इंटरनेट सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजहारिया यांनी ही माहिती दिली आहे. हॅकर्सने एअरटेल सिक्योरिटी टीम सोबत चर्चा केली आहे. ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. हॅकर्सने त्यांच्याकडे ३५०० डॉलर्सच्या बिटकॉइन्सची मागणी केली आहे. जर त्यांची मागणी मान्य झाली नाही तर युजर्संचा डेटा डार्क वेबवर सेल करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी एक बेकायदेशीर वेबसाइट बनवली होती. या ठिकाणी युजर्संचा डेटा एक नमुना सुद्धा दाखवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, २५ लाख एअरटेल युजर्संचा नमुना जम्मू काश्मीर मधील एका भागातील आहे.

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, आता ही वेबसाइट उपलब्ध नाही. राजशेखर राजहारिया यांनी सांगितले की, डेटा लिंक आता उपलब्ध नाही. आता दुसऱ्या लिंकवर उपलब्ध करण्यात आले आहे. हॅकरने डेटाला पब्लिक प्लॅटफॉर्मवर डंप केले होते. तसेच एअरटेल युजर्संचे नंबर सिस्टम आणि सर्वर वरून लिक झाले नव्हते. या टेडाला कोणत्याही अन्य सोर्सवरून लीक झाल्याची शक्यता आहे. यात सरकारी एजन्सीचा समावेश असू शकतो. जी सुरक्षाच्या कारणामुळे हे टेलिकॉम डेटाला अॅक्सेस करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here