जळगाव : प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात शहरात मजूर फेडरेशनतर्फे अन्नदान करण्यात आले. फेडरेशनतर्फे करण्यात आलेल्या या कार्याची दखल घेत स्वर्गीय सईद मलिक फाऊंडेशनतर्फे फेडरेशनच्या पदाधिकार्यांचा गौरव करण्यात आला.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात मजूर फेडरेशनतर्फे शहरात लॉकडाऊन काळात दररोज अडीच हजार लोकांना अन्नाची पाकिटे वाटप करण्यात आली होती. या कार्याची दखल घेत स्वर्गीय सईद मलिक फाऊंडेशनतर्फे फेडरेशनचा गौरव करण्यात आला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते फेडरेशनचे पदाधिकारी सभापती लिलाधर तायडे, संचालक वाल्मिक पाटील यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, करीम सालार, माजी महापौर विष्णू भंगाळे, शरद तायडे, नितीन लढ्ढा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित
होते.