नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘पावनखिंड’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सर्व स्तरांवरून याचे कौतुक करण्यात येत आहे. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल १० कोटींचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटानं शुक्रवारी १.५ कोटींची कमाई केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर, बाजीप्रभूंच्या भूमिकेत असलेल्या अजय पुरकर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. दुसरीकडे समीर धर्माधिकारी यांनी सिद्दी जौहरची भूमिका उत्तम वठवली आहे. सिद्दी मसूदच्या भूमिकेत असलेला आस्ताद काळे यानेही चित्रपटात उत्कृष्ट काम केले आहे.