मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
येथे नाभिक समाजातर्फे आयोजित नाभिक समाज तालुका मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगार होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम संत सेना महाराज, जिवाजी महाले, वीरभाई कोतवाल, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास नानाभाऊ शिरसाठ (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष), कार्यक्रमाचे मार्गदर्शक रामभाऊ शंकर टोंगे (ज्येष्ठ समाजसेवक मुक्ताईनगर) तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष मनोहर खोंडे, चंद्रकांत शिंदे, कुमार श्रीरामे, शिवाजीराव बहाडकर, जगदीश वाघ, संजय वाघ, भिकन बोरसे, प्रशांत बानाईत, युवा उद्योजक कुणाल गालफाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष्मीकांत सावखेडकर, डी.एस.चौधरी, भैय्या वाघ उपस्थित होते. त्यानंतर त्यानंतर उपस्थित मान्यवरांसह कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सिव्हील हॉस्पिटलचे डॉ.योगेश राणे, डॉ.निलेश पाटील व ऍम्बुलन्स चालक गोपाळ टोंगळे या कोविड योद्धाचा नाभिक समाजा तर्फे करण्यात आला व त्यानंतर लगेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये गोपाळा आमोदे (नायगाव), कविता श्रीराम सनांसे (रुईखेडा), सोनाक्षी दीपक श्रीखंडे (चांगदेव), लक्ष्मी नरेंद्र टोंगळे (बोहार्डी) यांच्यासह नाभिक समाजाचे माजी सरपंच संतोष रामभाऊ खोरखेडे (वढोदा), कडू जयराम बाभुळकर (मेळसांगवे) यांचा सत्कार नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर लगेच नाभिक समाज तालुका कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये तालुका अध्यक्षपदी गणेश अशोक टोंगे मुक्ताईनगर, उपाध्यक्ष श्रीराम काशिनाथ सनांसे (रुईखेडा), प्रमोद आंबेकर (कुर्हा), सुधाकर हरी सनांसे (अंतुर्ली), सचिव किशोर हरी हातकर (लोहारखेडा), कार्याध्यक्ष मनोहर बाबुराव सनांसे (मुक्ताईनगर), सहकार्याध्यक्ष उमेश जमकर (वढोदा), संघटक संजय गंगे (कुर्हा), संघटक संजय एकनाथ चव्हाण (मुक्ताईनगर), प्रसिद्धीप्रमुख ईश्वर भास्कर सोनवणे (निमखेडी बु॥ संजय रामदास टोंगळे, प्रवक्ता बंडू राजाराम सूर्यवंशी, महिला प्रतिनिधी शोभाताई कडू सनांसे, राणी धनराज श्रीखंडे, त्यानंतर नाभिक कर्मचारी संघटना यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच अध्यक्ष सुनील मोरस्कर, उपाध्यक्ष विजय लोंढे, सचिव गणेश सनांसे, सहसचिव मधुकर श्रीखंडे, कार्याध्यक्ष छगन मोरस्कर, कोषाध्यक्ष महिंद्र गर्गे, संघटक नारायण नानू श्रीखंडे, सहसंघटक रमेश मानकरे, प्रवक्ता अतुल लोंढे, महिला प्रतिनिधी जोस्तना सुंदरलाल चौधरी, सुलभा राजेंद्र शिरसाठ त्यानंतर लगेच मुक्ताईनगर तहसील कार्यालयाचे कर्मचारी जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त गजानन टोगळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक, कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर जिल्हा कार्यकारणी सदस्य कडू ओंकार सनांसे, विजय रामभाऊ टोंगे, सुनील वारुळे, जिल्हा कर्मचारी सदस्य नारायण श्रीखंडे व अतुल लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सुभाष सनांसे, रघुनाथ श्रीखंडे, एकनाथ लोंढे, गजानन टोंगळे, सुनील श्रीखंडे, नितीन सनांसे, गौरव बाबुळकर, बाळू श्रीखंडे, सुधाकर चौधरी, भास्कर मालवेकर, दीपक श्रीखंडे, सचिन मालवणकर, शंकर सनांसे, रवींद्र लोंढे, अजय येऊतकर, गणेश आमोदकर, गणेश तायडे, मनोज टोंगळे, सुंदरलाल चौधरी, बापू मालवेकर, गोपाळ भोंडकर, छगन मोरस्कर, गणेश लोंढे, लखन सनांसे, धनराज श्रीखंडे, कैलास वाघ यांच्यासह तालुक्यातील समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित
होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी नारायण श्रीखंडे, सुनील मोरस्कर, कडू सनांसे, महेंद्र गर्गे, गणेश सनांसे, छगन मोरस्कर, विजय टोंगे, मधुकर श्रीखंडे, नितीन चव्हाण, सुनिल वारुळे, भैया श्रीखंडे, पवन सोनवणे, संतोष रोढे, पंकज सनांसे, अरुण वाघ, सागर श्रीखंडे, आकाश सनांसे, विशाल चव्हाण, कमलेश चव्हाण, मुकेश वाघ, निलेश वाघ आदींनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन अतुल लोंढे यांनी केले.