चाळीसगाव ः प्रतिनिधी
खलाणे मोटार ड्रायव्हींग स्कूल, हरिओम आयटीआय व ऑनलाईन पीयूसी सेंटर यांच्या सौजन्याने आयोजित ३२ वे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्यामजी लोही यांच्याहस्ते करण्यात आले.
रस्त्यावर आपण स्वतःची व दुसर्यांची काळजी घेऊन कशा पद्धतीने ड्रायव्हिंग करायची याचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. संस्थेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी देखील रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रसार करण्यासाठी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष भिमराव खलाणे तसेच नानासाहेब रावते (संचालक, शितल मोटर्स), उपशहरप्रमुख वसीम चेअरमन, रघुनाथ कोळी (मच्छी विक्रेता संघ- शहर तालुका सचिव), बापू शिंदे, डॉ.दादाराव वाघ, प्रभाकर दिवनाले (धर्मगुरू, धर्मपीठ, महाराष्ट्र राज्य), राजेंद्र पाटील, वैभव कुलकर्णी, मुकेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. रस्ता सुरक्षा अभियान या कार्यक्रमासाठी आलेले श्याम लोही व रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन केल्याबद्दल भिमराव खलाणे यांचा धर्मपीठ या संस्थेकडून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य भूषण भिमराव खलाणे यांनी केले. सूत्रसंचालन व्ही.एस.देवरे यांनी केले. आभार संस्थेचे संचालक आशिष खलाणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेचे सर्व शिक्षक वृंद व ड्रायव्हिंग स्कूलचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.