गोठ्यात आग लागुन बैल ठार, दिड लाखांचे नुकसान

0
52

बोदवड : प्रतिनिधी सुहास बारी 

तालुक्यातील येवती येथे शेतातील गोठ्यास व शेतखोलीसआग लागून एक बैल मरण पावला तर एक बैल, एक,गाय,व म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात एक लाख पस्तीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.


येवती गावचे सरपंच यांचे लहान भाऊ पांडुरंग त्रंबक वाघ यांचे गावा लगतच्या शेतात असलेल्या गोठा व शेतीची औजारे व कुटार, कुट्टी असलेल्या खोलीस रात्री एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली .आग लागल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी आग विझवली मात्र या आगीत एक बैल तात्काळ मृत्युमुखी पडला तर एक बैल ,गाय, व म्हैस गंभीर जखमी झाले आहेत. तसेच जनावरांसाठी साठवून कुट्टी ,कुटार, जळून खाक झाले.यात एक लाख पस्तीस हजार रुपयांचा नुकसान झाल्याचा पंचनामा एम.एल.रत्नानी, कोतवाल तुषार सावरीपगार यांनी केला. या आगी बाबत बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here