जळगाव ः प्रतिनिधी
येथील घटनेचा तेली समाजातर्फे निषेध करण्यात आला. तसेच घटनेचा निःपक्षपणे तपास करून पिडीत बालिकांना न्याय द्यावा, अशा मागणी निवेदन पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धरणगाव येथे सहा व आठ वर्षीय बालिकांवर करण्यात आलेल्या अत्याचाराने तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हा गुन्हा अत्यंत निंदनीय व घृणास्पद असल्यामुळे या घटनेचा तपास निःपक्षपातीपणाने करावा, असे निर्देश स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात यावे, आरोपीला जामीन मिळू नये असे गंभीर स्वरुपाचे कलम लावण्यात यावे, नुकताच महाराष्ट्र सरकारने पारीत केलेला शक्ती या बिलाअंतर्गत 15 दिवसात दोषारोप दाखल करावे, या खटल्यासाठी अभ्यासी सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी, हा खटला जलद न्यायालयात वर्ग करण्यात यावा, शासन नियमावलीनुसार पिडीत बालिकेला व बालिकेच्या परिवाराला शासकीय संरक्षण देण्यात यावे, या गुन्ह्यात मुलाला सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.